
दैनिक चालु वार्ता आटपाडी प्रतिनिधी-दादासो वाक्षे
आटपाडी:-
(झरे) ता आटपाडी येथील जवाहरलाल नेहरू विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या सन १९९२-९३ सालच्या व कॉलेजच्या पहिल्या एच.एस.सी.बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.मराठी विषयाचे प्राध्यापक व जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे चेअरमन प्रा.साहेबराव चवरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले,मित्र चांगला लाभल्यानंतर जीवनातील सर्व दुःखे सुसह्य होतात.देव,भाव,गाव यांच्याकडून अपेक्षा करू नये.समाधान आनंद घेण्यात असते, ते असेल तर काही अडचण येत नाही.आनंद हा दुसऱ्याला सांगितला की दुणावतो आणि दुःख हे दुसऱ्याला सांगितले की उणावते.काळ बदलला आहे, आताचा काळ सुखाचा आला आहे.वाममार्गाने जगण्याचे मार्ग नव्याने निघाले आहेत,ते अवलंबू नका.विद्यार्थ्यांनी फार जिवापाड आदर केला.मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अतिशय क्लेशदायक असतो.सग्या-सोयऱ्यांपेक्षा मित्रवर्ग अडचणीच्या काळात उपयोगाला येतो.त्यांनी यावेळी विविध कविता सादर केल्या.
दस्तगीर शिकलगार म्हणाले, त्याकाळी प्रत्येक वर्षी धडपडत शिकवले.पूर्वी इंग्रजी शिक्षणाची अवस्था वेगळी होती.आता शिक्षणामध्ये बदल झालेला आहे माजी मुख्याध्यापक व भूगोलाचे शिक्षक सुरेश कदम म्हणाले,आपण आनंदासाठी जगले पाहिजे.एकमेकांना सहाय्य करुया.आपला दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा.शेती क्षेत्रात दृष्टी ठेवून व्यावसायिक शेतीमध्ये उतरावे.
माजी मुख्याध्यापक व राज्यशास्त्राचे शिक्षक पी.एन.कुंभार म्हणाले, प्रेम,शक्ती,बुद्धी या सर्व गोष्टी पणाला लावल्या पाहिजेत.जीवनात नेहमी आनंद द्यायचा-घ्यायचा असतो.सत्य हे कटू असते.काळ कोणासाठी थांबत नाही. सतत परिवर्तन होत असते.
सांगली जिल्हा आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक हैबतराव पावणे,माजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक देवानंद घोणते,बापूसाहेब वाघमारे ,संजय घोणते पत्रकार सदाशिवराव पुकळे, अंगणवाडी सेविका विमल खोत,दिलीप वाघमारे ,लखन पडळकर नारायण मोटे,प्रकाश कदम,दुर्योधन गोरड ,वर्षा राजमाने, विष्णू गोरड,प्रवीण पावणे,आनंद यादव, राजेंद्र पाटील,तानाजी गोरड यांनी आपला परिचय करून दिला.बापूसाहेब वाघमारे यांनी आभार मानले.