
दैनिक चालू वार्ता भुम तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- तालुक्यातील पाथरुड महा NGO फाउंडेशन आपुलकी बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्यावतीने प.प.श्री श्री श्री रविशंकर गुरुदेव यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधत बाल चेतना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्या प्रसंगी मार्गदर्शन मा.चंद्रकांत राठी,शेखर मुंदडा, मुकुंद शिंदे, सौ प्रणिता जगताप यांच्या प्रेरणेतून शिबिर घेण्यात आले. यावेळी संजीवनी अकोसकर यांनी मुलांना संस्कार योग, साधना , बुद्धिमत्तेचा विकास ,आनंदी जीवनाची कला शिकवली. यावेळी उपस्थित बिभीषण नागरगोजे ,झोळ सर, मा. सरपंच बापूराव तिकटे, सौ सोनाली तिकटे , जनार्धन काटे,सौ सविता दरंदले या सर्वांचे आभार राजेंद्र दरंदले यांनी व्यक्त केले. असंख्य नागरिक विद्यार्थी उपस्थित होते.