दैनिक चालू वार्ता पुणे शहर प्रतिनिधी-विशाल खुणे
दि. 16 मे (पुणे देहू भंडारा डोंगर)
मराठवाडा जनविकास संघ, पुणे वृक्षदाई प्रतिष्ठान आणी भंडारा डोंगर ट्रस्ट यांच्या वतीने बौध्द धम्माचे धम्मगुरु झेन मास्टर भन्ते सुदस्सन यांच्या हस्ते सहा फूट उंचीच्या 100 बोधिवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
भंडारा डोंगर, देहूगाव /इंदोरी येथे ज्या ठिकाणी बुध्द लेणी आहे. त्या ठिकाणी बुध्द ज्ञान प्राप्ती आठवण म्हणुन बोधि वृक्षाला संबोधले जाते. युवा उद्योजक, (निसर्ग मित्र ) अरुण पवार यांनी वैचारिक वारसा जपून यावेळी बोधिवृक्षाचे वृक्षारोपण लावून आपली दर वर्षी हजारो वृक्ष लावण्याची प्रथा अबाधित ठेवण्यात आली.
देहू गाव हे संत तुकाराम महाराजांचे ज्ञानप्राप्तीचे ठिकाण आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन वृक्षमित्र अरुण पवार व त्यांचे सहकारी यांनी केले याप्रसंगी बोलताना अरुण पवार म्हणाले की वृक्ष जगतील तरच पृथ्वी राहणार अन्यथा ति बंजर होईल सजीव सृष्टी जिवंत राहणार नाही. प्रत्येक वेळी वृक्ष लागवडी साठी मला काही निमित्त लागते तरीही ही बुध्द पौर्णिमा ची संधी जावू न देता. बुध्द विचार पेरण्या चा आणी संवर्धन करून ते जपण्याचा प्रयत्न करीत आहे . सर्वानी मला माझ्या मित्र मंडळी प्रमाणे वृक्ष व पृथ्वीचा विचार करून निसर्गाला साथ देवून वृक्ष लावावे अशी विनंती करतो असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही संयुक्तपणे गेल्या पाच वर्षा पासून देहू आणी परिसरात वृक्ष संवर्धनचे काम केले आहे दरवर्षी हजारो वृक्ष लागवड केली आहे आणी जोपासना या संस्थेमार्फत केली जात आहे. वृक्ष लागवड आणी संवर्धन ही सामाजिक चळवळ व्हावी यासाठी असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत असे ते म्हणाले.
वारकरी संप्रदायातील मंडळी वृक्ष मित्र कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थिती. भंते झेण मास्टर सूदस्सेन, मा. नगरसेवक राजेंद्र जगताप, मा. नगरसेवक राजू लोखंडे, अरुण पवार (मराठवाडा जणविकास संघ अध्यक्ष), जोपासेठ पवार, सचिन पवार, अर्जुन शिंदे, दीपक कसाले, सतीश चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
