दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जन्म आणि मृत्यू या मधील प्रवास म्हणजे जीवन जन्म आणि मृत्यू दोन्ही बाबी आपल्या अखत्यारीत येत नाहीत .किंवा त्यावर आपलं नियंत्रण नाही . तसेच हा प्रवास किती हे पण आपल्या अधिकृत महित नाही . तरी पण जीवनाच्या रंगमंचावर प्रत्येकाला आपला अभिनय करणे हि करणे आहे. आणि हा अभिनय करताना आपण आपला दृष्टीकोन दृष्टी जशी ठेवु तसं आपलं जीवन घडेल.
जन्माला येताना कोणीही सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला येत नाही.तसेच आपण आपला जन्म गरीब किंवा श्रीमंत अशा कोणत्या कुटुंबा मध्ये घ्यावा हे पण आपल्या हातात नाही . आपली दृष्टी, दृष्टीकोन, आणि कर्तृत्व यावर आपलं जीवन चांगले वाईट घडते .म्हणून जीवनात जीवन जाण्याची दृष्टी हि खूप महत्वाची आहे.तसेच जीवना कडे नेहमी सकारात्मक पद्धतीने पाहिल पाहिजे .आपला दृष्टीकोन नेहमी सकारात्मक तसेच दुरदृष्टी तसेच जिद्द चिकाटी मेहनत यावर जीवनातील निरंतर प्रयत्न असतील येणारे परिणाम योग्य येतील या मध्ये काही शंका नाही.जशी आपली दृष्टी असते तसं आपलं जीवन असतं. आणि म्हणूनच आपली दृष्टी नेहमी सदैव सकारात्मक असेल तर आपलं जीवन सुखी समाधानी आनंदी होईल. आणि आपली दृष्टी सदैव नकारात्मक असेल तर आपलं जीवन दुःखी , वेदनादायी, चिंताग्रस्त होईल. म्हणून आपला दृष्टीकोन बदला आपलं जीवन नक्कीच बदलेल.पृथ्वी वर अनेक प्रकारचे प्राणी , सजीव , जीव अस्तित्वात आहेत. त्यापैकी मानव हा एकमेव विशेष प्राणी आहे .की ज्याचं सर्व जीवसृष्टी वर साम्राज्य निर्माण झाल आहे .मानवाने आपल्या तलक बुद्धी चातुर्याने सर्व जीव सृष्टी वर ताबा मिळवला आहे . परंतु या सगळ्या मध्ये प्रत्येक व्यक्ती ची समाजिक,आर्थिक, सैद्धान्तिक,बौद्धिक,गुणात्मक, परस्थिती एक सारखी नाही.आणि म्हणून तसं पाहिलं तर मानवी जीवन हे खूप मौल्यवान आहे . परंतु ते समजलं तर जाणल तर आणि म्हणूनच सगळ्यात महत्वाचे आहे.ते दृष्टीकोन योग्य असेल तर जीवन योग्यच. असणार या मध्ये काही शंका नाही. म्हणून जीवन जगण्यासाठी आपली काय कल्पना आहे .संकल्पना आहे काय धेय्य आहे .काय उदेश आहे .आणि जीवनाकडे आपण किती सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतोय यावर जीवनातील विविध बाबी अंवलबुन असतात . आपण प्रत्येक गोष्ट बाब सकारात्मक पद्धतीने खेळाडू वृत्तीने घेतली पाहिजे. जीवनातील प्रत्येक बाबींकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन कसा आहे. हे खुप महत्वाचे आहे. म्हणून जीवन ज्ञान पुर्ण समाधान कारक पद्धतीने योग्य मार्गाने पुढे ने्हयाचे असेल. तर आपल्याला आपला दृष्टीकोन बदलावा लागेल.तसेच आपण ज्या पद्धतीने जगाकडे पाहण्याचा प्रयत्न करणार त्याच पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया प्रतिसाद मिळणार म्हणून आपला दृष्टीकोन कसा आहे. यावर आपलं जीवन अंवलबुन आहे.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक 9011634301
