
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
खामगाव: दि.१९. गो.से. महाविद्यालय येथे १३ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने या महापुरूषाच्या जीवन कार्यावर” महापुरुष समजून घेताना” या विषयावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महा विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल परिक्षण समितीने नुकताच जाहीर केला आहे.
या स्पर्धेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.बक्षीस वितरण सोहळ्याचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. एस. तडवळकर तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. प्रफुल उबाळे उपस्थित होते.१३ मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रश्न मंजुषा चा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयातील कुमारी प्रगती संजय वानखडे हिला प्रथम क्रमांक मिळाला तर द्वितीय क्रमांक पवन संतोष चव्हाण याला मिळाला.वरिष्ठ गटात बी.ए. फायनल चा विद्यार्थी रविराज महादेव हॅन्ड यास प्रथम क्रमांकाचे तर अमन विजय गरड बी.ए. सेकंड क्रमांकाचे बक्षीस मिळाले.प्रथम क्रमांकास एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र तर दितीय क्रमांक पाचशे एक रुपये रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र अशे या बक्षिसाचे स्वरूप होते.