दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
कंधार:-शेतकऱ्यास चांगल्या प्रतीचे बियाणे खत औषधे मिळण्यासाठी खरीप हंगाम 2021-22 साठी बियाणेव खतांचा काळाबाजार रोखणे व खताचा साठा करून वाढीव दराने खते विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका पातळीवर समिती नेमून प्रत्येक दुकानदारावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती नेमणे आवश्यक आहे समितीमध्ये शेतकरी प्रतिनिधी असावेत इ.स. 2020 च्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे बोगस देण्यात आले व शेतकऱ्यावर तीबार पेरण्याची वेळ आली व मार्च 2020 कोरोणा संसर्गामुळे शेतीमाल विक्रीसाठी अनेक अडथळे निर्माण होऊन आर्थिक नुकसान झाले तरी माननीय तहसीलदार साहेब कंधार यांनी समिती नेमून शेतकऱ्यास सहकार्य करावे असे निवेदन जाधव व्यंकटी व माधव विभुते यांनी तहसीलदार साहेब कंधार यांच्याकडे दिले आहे.


