दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
लातूररोडच्या संत गोविंदबाबा किक्रेट क्लबला दुसरे पारितोषिक
चाकूर –
चाकूरचा रॉयल किक्रेट क्लब ठरले विलासराव देशमुख चँम्पियनशिपचे मानकरी तर लातूररोडच्या संत गोविंदबाबा किक्रेट क्लब दुसऱ्या पारितोषिकाचे मानकरी ठरला आहे.
लोकनेते विलासराव देशमुख चॕम्पियन किक्रेट स्पर्धा ही प्रत्येक तालुकास्तरावर आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत वरील दोन संघास प्रथम व द्वितीय म्हणून असे पारितोषिक देण्यात आले.दिवस-राञ खुल्या टेनिस बॉल स्पर्धा घेण्यात आल्या.चाकूर तालुकास्तरावर ४० संघानी स्पर्धेत सहभाग घेतला होता.ग्रामीण भागातील अनेक खेळाडुंनी आपल्या खेळांचे उत्कृष्ट प्रदर्शन करुन स्पर्धा गाजवली.
यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांक पटकावलेल्या रॉयल कीक्रेट क्लबला एक चषक व रोख ५१ हजार रुपये, द्वितीय आलेल्या संतगोविंदबाबा लातुररोड संघाला एक चषक रोख रक्कम ३१ हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात आले.या स्पर्धेत मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज,उत्कृष्ट गोलंदाज यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे,संजय पाटील,नरसिंग गोलावार,बाळु जाधव,अनिल चव्हाण,बिलाल पठाण,सलीम तांबोळी, परमेश्वर नवरखेले,मोहन सावळे सह खेळाडू उपस्थित होते.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नगरसेवक भागवत फुले, शहराध्यक्ष पप्पुभाई शेख,निलेश देशमुख,सलीम तांबोळी आदीनी परिश्रम घेतले.
