
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम :-येथील शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीची येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगरपरिषद निवडणुका सोमोर ठेऊन, जिल्हा परिषद सर्कल ,नगर परिषद संदर्भात मेळावे घेण्यात येणार आहेत.मेळावे जिल्हा परिषद गटामध्ये,नगर परिषदच्या प्रत्येक प्रभागात बैठकी घेतल्या जाणार आहेत. बैठकीस मार्गदशन वंचितचे तक्रार निवारण समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. विष्णू जाधव यांनी केले.तर प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल उपस्थित होते.यावेळी तालुका अध्यक्ष मुसा शेख, तालुका उपाध्यक्ष महावीर बनसोडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष वैभव गायकवाड ,अक्की गायकवाड ,रोहित गायकवाड ,आकाश गायकवाड ,सादिक सय्यद, अमोल भोसले, छकुल सरवदे, यशराज शिंदे, दीपक इजगज, सचिन शिंदे ,मुकुंद लगाडे, ल टी शिंदे ,उमेश गुंजाळ, दीपक सोनवणे ,आदी पदाधिकरी कार्यकर्ते उपस्थित होते.