दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व धार्मिक आदी क्षेत्रात अग्रेसर असणारे शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोहा येथील नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण व पत्रकार मित्रांच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात आले.
लोहा नगरीचे प्रथम सरपंच तथा खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन कै. यशवंतराव चव्हाण यांचे चौथे सुपुत्र असलेले कै. यशवंतराव चव्हाण यांचा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व धार्मिक वसा जोपासणारे वडीलांच्या पावलावर पाऊस टाकीत गोरगरीबांना मदत करणारे हजारो विद्यार्थी घडविणारे अनेक विद्यार्थ्यांना, शिक्षक बांधवाना मदत करणारे शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण यांचा आज दि. २२ हे रोजी वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गुलाब पुष्पहार घालून पेढा भरवून नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, पत्रकार विलास सावळे, पत्रकार युनुस शेख, छायाचित्रकार विनोद महाबळे यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
तसेच लोहा शहर व तालुक्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
