दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
मलकापूर (बुलडाणा): दि.२३. समाधान सुरवाडे यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन एन टीव्ही मराठीच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय आदर्श प्रतिनिधी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार दि. २६/५/२०२२ रोजी त्यांना दिग्गज मान्यवरांच्या हस्ते अहमदनगर येथे आयोजित कार्यक्रमात देण्यात येणार आहे.पत्रकारिता क्षेत्रात समाधान सुरवाडे यांनी मराठी वृत्त वाहिनीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक ,राजकीय ,क्रीडा, अशा विविध विषयात जनजागृतीपर उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे मराठी वृत्तवाहिनी त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आदर्श प्रतिनिधी पुरस्कार देण्यात येणार आहे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
