
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील ३४२ वाड्यावस्त्यांवरील सव्वा लाख नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ३६ गावांमधील २५३ वाड्यावस्त्यांमधील ९६ हजार ३८० नागरिकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे.
राज्य सरकारने या नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत वितरित केला जाणार आहे. या निधीचा वापर प्राधान्याने टॅंकरने पाणीपुरवठा करणे, विहिरी अधिग्रहण करणे, विंधन विहीरी साठी वापरण्यात येणार
पाणीपुरवठा करताना खासगी टॅंकरसाठी जीपीएस प्रणालीची सक्तीची करण्यात आली असून, जीपीएस प्रणाली नसलेल्या खासगी टॅंकरला बिले देवू नयेत, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
आंबेगाव तालुक्यात टंचाई अधिक असून
बारामती, जुन्नर, खेड, पुरंदर, भोर आणि शिरूर या तालुक्यांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सरकारने लक्ष घालावे.