
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे, ता. २४ :तळजाई , पाचगांव पर्वती वन आराखड्यासाठी मंजूर करून आणलेला १३ कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग वनीकरणासाठीच केला जाईल. वन विभागाने या ठिकाणी कॉंक्रिटिकरण किंवा सुशोभिकरणाचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडू असा इशारा देवून मेट्रो व वन खात्यावर आमदार माधुरी मिसाळ यांनी निशाना साधला आहे.
मिसाळ यांनी आज सकाळी तळजाई टेकडी वनक्षेत्रांत (पाचगांव पर्वती) भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. वन विभागाचे अधिकारी दीपक पवार, प्रदीप संकपाल, माजी नगरसेवक महेश वाबळे, साईदिशा माने, श्रीकांत जगताप, पर्वती भाजपचे अध्यक्ष जितेंद्र पोळेकर, सरचिटणीस प्रशांत दिवेकर, शैलेश देशपांडे, विश्वास ननावरे, सहकार नगर नागरीक मंचच्या तळजाई बचाव अभियानाचे अमित अभ्यंकर, पुरुषोत्तम दुरवास आदि मान्यवर उपस्थित होते.