
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा : दि.२४.
येथील मोहम्मद नसरुद्दीन मोहम्मद सिद्दीक अन्सारी वय ५६ वर्ष रा.श्री शिवाजी नगर मोहता हॉस्पीटल जवळ नांदुरा यांची महींन्द्रा पिकअप क्रमांक एम एच २८ एच ८२८६ क्रमांकाची गाडी आलमगीर लाल मोहम्मद अन्सारी यांनी पेटवून दील्याबाबत तक्रार दाखल केली आहे.याबाबत सविस्तर असे की मोहम्मद नसरुद्दीन मोहम्मद सिद्दीक अन्सारी वय ५६ वर्ष रा.श्री शिवाजी नगर मोहता हॉस्पीटल जवळ नांदुरा हे स्वःताच्या खामगाव रोड वरील डागा पेट्रोल पंपाजवळील गोडावून येथे सदर गाड़ी दी. २२/०५/२०२२ रोजी रात्री ०९ वाजता गोडावुन समोर ऊभी करून गेले असता आलमगीर लाल मोहम्मद अन्सारी रा.श्री शिवाजी नगर मोहता हॉस्पीटल जवळ नांदुरा याने मागील भांडणाच्या कारणावरून नुकसाण करण्याच्या हेतुने खोडसाळ पणाने माझी गाडी पेटवून देवून सदर गाडीचे समोरील टायर व इंजिन कॅबीन व संपुर्ण गाडी जळुन दिड लाखाचे नुकसण केले आहे. अशा फिर्यादीच्या तोंड तक्रारीवरून नापोका आघाव यांनी अप३२६/२०२२कलम ४३५ , भादवी नुसार सदरचा गुन्हा दाखल करून पुढील तपास मा.पो नि सा .यांचे आशाने पो. उ. प नि.उमाळे सर यांचेकडे देण्यात आला