
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा: दि.२४.अनेक विचारवंत,अभ्यासक, इतिहासकार,महान सम्राट म्हणून संबोधतात परंतू त्यांच्या जयंती बद्दल का?सांगत नाही.हिच मनाला व्यथा वाटते!!
ज्या सम्राटाने सम्राट असून बौद्ध धम्म स्विकारला आणि या भारत देशात चौऱ्यांशी हजार विहारे,स्तुपं बांधून ठेवले, शिलालेख कोरलेले असून,तथागत बुद्धांनंतर खर तर धम्म जागृत ठेवला.बुद्ध लेण्या तयार करून बुद्धाचे महत्व कायम करून ठेवले. त्याच सम्राटाचा उदोउदो कोणी तज्ञ, इतिहासकार,नेता सांगत नाही!त्याच्या जन्म दिवसाची महिमा सांगत नाही ही मोठी शोकांतिका वाटते.
ज्या सम्राटाचे २४)आऱ्याचे अशोक चक्र आपल्या भारत देशाच्या तिरंगी झेंड्यावर लावल्या जाते.ज्यासम्राटाचे चार सिंहाचे प्रतिक भारत सरकारच्या प्रत्यक्ष मुख्य कामात राजमुद्रा म्हणून वापरल्या जाते,ज्या देशात अशोक चक्र शौर्याचे प्रतीक म्हणून दिले जाते,सम्राट अशोक हा पहिला आणि शेवटचा सम्राट मानले गेलेले आहे.ज्यानी संपूर्ण भारत, नेपाळ, बाग्लादेश, पाकिस्तान, आणि अफगाणिस्तान एवढ्या मोठ्या भुभागावर एकछत्र राज्य केले,सम्राट अशोक काळात त्यांनी विश्वविद्यालये स्थापन केले. जसे. नालंदा, तक्षशिला, आणि विक्रमशिला,हे प्रमुख प्रख्यात विद्यालये होते.देश विदेशातून विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात येत असत.ज्या सम्राटचे शासन काळात जगातील विद्वान व इतिहासकार भारतीय इतिहासाला सुवर्ण काळ मानत होते.सम्राटाचे शासन काळात भारताला गुरुदेश मानत होते.व सोन्याची चिडिया म्हणत होते.जनता भेदभाव रहित खुश हालीने नांदत होती. सम्राट काळात महामार्ग,ग्रेड ट्रंक रोड,,२,०००कि.मि.लांब सडक त्यांच्या दुतर्फा झाडं व सलाम(ढाबे) बनवलेले होते.मानसा साठीच काय पशु पक्षी यांना दवाखाने होते.ज्याचा जन्म इ,सुद्धा,पु,३०२साली झाला. त्याच्या वडिलांचे नांव राजा बिंदुसार मौर्य होते.आईचे नांव सुभद्राणी होते.सम्राट अशोकाचा राजतिलक इ,सुद्धा,पु,२६८ ला झाला होता.व देहावसान इ,स,पु,२३२साली झाला होता.
सम्राट अशोकाचे एवढेच कार्य नसून आपली मुलगी संघमित्रा व मुलगा महेंद्र यांना बुद्ध धम्माची दीक्षा देऊन बुद्ध गयेतील बोधीवृक्षाची फांदी घेऊन श्रीलंकेत पाठविले व अनुराधापूर मध्ये लावून श्रीलंकेत धम्म प्रसार,प्रचार करावयास पाठविले होते.सम्राटाचे पाली भाषेतील शिलालेख अजूनही कोरलेले आहेत.अनेक ठिकाणी स्तंभ बांधलेले आहेत.तरी पण इतिहासकार व ज्ञानीवंत भंतेजी व आपणाला सम्राट अशोकाचे महत्व का व्यवस्थीत सांगत नाही.
सम्राट अशोकाचे गिरीलेख व लघुगिरीलेख, म्हणजे शिलालेख कोरलेले आहेत. स्तंभलेख,गुफालेख आहे.रस्त्याच्या दुतर्फा अनेक पाली भाषेतील शिलालेख कोरलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी, स्तंभ, लेख,मुर्त्या,१४ लेख आहेत.त्यापैकी (८) आदेश लेख आहेत. धौली, शहाबाजगढी,मानसैहर,कालसी,जौगढ,सोपारा एरागुढी, आणि गिरनार या ठिकाणी आहेत.यावरुन सम्राटाचा स्वभाव,धम्म तत्व राज व्यवस्था समाज स्तिथी समजते. अशोकाचे १४ आदेश व विषय
▪️पशुची बळी देण्याला बंदी. मणुष्य व प्राणी यांची चिकित्सा
राज्यातील वरिष्ठ राजुकाची दर पांच वर्षांनी धम्मदिक्षा
प्रचार दौरे, ल़ोकात धम्मपालनाचेआदेश.
सम्राट अशोकाचे काळात काश्मिरमध्ये कुंडलवन येथे वसुमित्राच्या नावाने तिसरी धम्म संगिती भरवली होती.
खरं सांगा कायम पुराव्यानिशी केलेले धम्म कार्य अखंड ,अबाधित असलेल्या सम्राटाला का वंचीत ठेवल्या गेलं आहे.बाकी इतिहासकार, साहित्यिक विचारवंत यानी अनेक चांगले धम्म कार्य, केले.तेसुद्धा इतिहास ज्याचं झाले आहे.म्हणून सम्राटाने केलेले कार्य लेण्या, मोठमोठे मदिरं यात अशोक कालीन पुरावे सापडत असून सुद्धा अशोक का जनतेत रुजवल्या जात नाही??ही फार मोठी शोकांतिका आणि व्यथा आहे..
मेढे मुर्तिकार वडनेर भोलजी