
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
कंत्राटदार व उपअभियंताच्या संगणमताने भ्रष्टाचार होतअसल्याचा पळसपुर ग्रामस्थांचा आरोप…..
हिमायतनगर-गेल्या अनेक वर्षापासून मौजे पळसपुर-डोल्हारी-सिरपल्ली रस्त्याची दयनिय अवस्था झाली होती. यारस्त्यावरून विदर्भाततील गांजेगाव ढाणकी,उमरखेड,पुसद,यवतमाळकडे जाण्यासाठी सोपा जलदचा मार्ग म्हणून नावारूपास आलेला हा रस्ता आहे,पंरतु या मार्गावरुन प्रवाशांना प्रवास करताना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे.अनेक वेळा या रस्त्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केल्यानंतर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर रस्त्याच्या कामाला संथ गतीने आणि गुत्तेदार अभियंत्यांच्या संगणमताने निकृष्ट दर्जाचा मांजऱ्या खडक आसलेला दगड व मातीमिश्रित मुरुमाचाअल्पप्रमाणातअंदाजपत्रकाला बगल देत पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कामे सुधीर पाटील उपविभागीयअभियंता,प्रधानमंत्री ग्राम सडक योजना विभाग जि.प.नांदेड शाखा अभियंता निखिल कायंदे व गुत्तेदार मे.एम.ए.सिद्धिकी औरंगाबाद हे ग्रामीण रस्त्यातूनआपल्याला जास्तीत जास्त पैसा कसा उरवता येईल या हेतूने रस्त्यावरील कामास सुरूवात झाली. हा रस्ता बारा किलोमीटर अंतराचा असुन सात कोटी तिस लाख चौविस हजार रुपयांच्या रस्त्याचे पुलं मोर्यासह मजबुतीकरण करून डांबरीकरण करण्याच्या कामाला संथगतीने सूरूवात करून मातीमिश्रीत मुरूम आणि खराब दगड वापरून कंत्राटदार मे.एम.ए.सिद्दीकी काम करत आहे. तसेच रस्त्याचे व्यवस्थित खोदकाम करून मजबुतीकरण करण्याचे असताना केवळ वरचाभागच तेवढा दबई करून थातूर-मातूर पध्दतीने जेसीबीने उकरून रस्त्याच्या कामाची विल्हेवाट लावण्याचं काम कंत्राटदार मे.एम.ए. सिद्दीकीऔरंगाबाद करत आहे. या रस्त्याच्या कामाची देखभाल करण्याचं काम उपअभियंता सुधीर पाटिल रस्त्याच्या कामाकडे अद्याप पर्यंत साईटवर येऊन बघितले सुद्धा नाही.एकंदरीतच मौजे पळसपुर-डोल्हारी-सिरपल्ली रस्त्याची विल्हेवाट सर्वजन मिळून लावतआहे.जो रस्त्याच्या कामाला दगड वापरल्या जात असलेला दगडावरून मोठे वाहन गेल्यास तो दगड चुरा होतआहे.हा दगड रस्त्याच्या कामाला वापरल्यास रस्ता लवकरच खचेल आणि पुन्हा या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरीकांना खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे.मातीमिश्रीत मुरूम, निकृष्ट दर्जाचा दगड कंत्राटदार मे.एम.ए. सिद्दीकीऔरंगाबाद वापरतअसताना एकाही लोकप्रतीनिधीचे याकडे लक्षन जाने हेआश्चर्याचेच मानावे लागेल.या रस्त्यावरून लग्न सोहळ्यासाठी विद्यमान आमदार,माजीआमदार, जिल्हा परिषद सदस्य,सभापती, वेगवेगळ्या पक्षाचे सत्ताधारी व विरोधक राजकीय तालुकाध्यक्ष तसेच जिल्हापरिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या नेत्यांनी सहीत् प्रवास केला परंतू एकाही नेत्यांचे या रस्त्याच्या कामाकडे लक्ष नजाने जाणकार नागरीकांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे.लोकप्रतिनिधी केवळ आप आपल्या पक्षातील नेत्यांना आगामी काळातील निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सुचना देत आहेत परंतू आपल्याच मतदारसंघात कंत्राटदार रस्त्याचे काम कसे करत आहेत याकडे लक्ष द्यायला वेळ नाही ही सर्वात मोठी शोकांतीका मनावी लागेल सर असे जाणकार ग्रामस्थांमधून बोलल्या जात आहे.