
दैनिक चालु वार्ता कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी-प्रदिप मडावी
कोरपना तालूका लोणी
आज दिनांक -२३/०५/२०२२ला मातोश्री महिला प्रभागसंघ कोडशी -भोयगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली । या सभेत प्रभागसंघ यांचा आर्थिक लेखा -जोखा यांचे वाचन करण्यात आले ।तसेच महिलांचा आनंद द्विगुणित करण्याकरिता विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले ।उदा .रांगोळी स्पर्धा ,चमचा गोळी,दौड स्पर्धा,नृत्य स्पर्धा,एकल नृत्य,पथ नाट्य,गीत गायन तसेच अंधश्रद्धा निर्मूलनावर पथ नाट्य करण्यात आले यामधून महिलांना लोकांवर श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा असू नये हा संदेश समाजापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला । या स्पर्धेचा उद्देश महिलांच्या अंगी असणारे सुप्त गन यांना कुठे तरी वाव मिळावा व महिलांचे मनोबल वाढावे हा त्या मागचा उद्देश होता.त्याच प्रमाणे उमेद अभियानाची पार्श्वभूमी महिलांना सांगण्यात आली, या कार्यक्रमाचे संचालन सातपुते ताई यांनी केले तर प्रास्ताविक राजूरकर ताई यांनी पार पाडले .कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.रिपिका एलपुंडवार सरपंच ग्रा.पं. लोणी, उदघाटक श्री.एकनाथजी वडस्कर पो.पाटील लोणी,श्री .आवारी सर मुख्याध्यापक जि. प.शाळा लोणी ,श्री.नंदकिशोर वडस्कर तं. मुक्ती अध्यक्ष,श्री.अविनाशभाऊ वाभिटकर ,कु.बोनसुले मॅडम ता.अ. व्यवस्थापक ,श्री.संदीप पराते प्रभाग समन्वयक ,श्री.अंनवेनवर,श्री.दिनेश जीवने कृ. व्यवस्थापक,किनाके, श्री.आहेर सर ,आभार प्रदर्शन देवतळे ताई यांनी पार पाडले ,तसेच प्रभागातील सर्व ICRP, CTC, बँक सखी,कृशी ,पशु सखी तसेच प्रभाग संघ अध्यक्ष रेश्माताई खापणे,सचिव प्रियाताई वनकर,कोशाध्यक्ष किरणताई गेडाम,तसेच सर्व ग्रामसंघ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ।