
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
नांदेड :- नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर यांच्या मनमानी स्टंटबाजी खंडपीठाचेआदेशअसतानाही ३६ मुख्याध्यापकांच्या शास्तीची, शिस्तभंगाची कार्यवाहीमध्ये कामचुकार कारभारामुळे त्यांची त्वरित हकालपट्टी च्या मागणीसाठी दिनांक २४/०५/२०२२ रोज मंगळवार पासून आमरण उपोषण पुकारण्यात आले आहे. उपोषणामध्ये पांडुरंग व्यंकट कंधारे , अण्णा हजारे प्रणित संघटनेचे सदस्य , संभाजी गोविंद पवळे, कदम जयवंतराव पाटील सामाजिक कार्यकर्ते, लक्ष्मण येताळे, वडजे पाटील, विठ्ठल गायकवाड, व्यंकटी गोविंद जाधव हे सर्व जण उपोषणाला बसले असून जोपर्यंत श्रीमती वर्षा ठाकूर यांची नांदेड जिल्हा परिषदेमधून हकालपट्टी होणार नाही. तोपर्यंत उपोषणकर्ते उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यानी व्यक्त केला आहे. प्रतिनियुक्त्यात मनमानी व कमालीचा भ्रष्टाचार केला आहे. विभागीय आयुक्तांची रितसर कुठेही मान्यता घेतली नाही, याविरोधात ओरड झाली की केवळ प्रतिनियुक्ती हद म्हणून स्टंटबाजी केली आहे. परंतु प्रतिनियुक्त्या जैसे थे आहेत. विभागीय माहिती आयुक्त खंडपीठाने ३६ मुख्याध्यापकांना शास्तीच्या व शिस्त भंगाच्या कार्यवाहीचे आदेश पारित २०२०-२१ सालात केले आहेत.परंतु यांच्या अमलबजावणीत श्रीमती ठाकूर मॅडमकडून पारदर्शकता का? नाही यांच्यावर कार्यवाही सुध्दा नाही. संस्थाचालक व मुख्याध्यापक यांच्यामध्ये साटेलोटे घडवून आणले आहे. तसेच सध्या जिल्हा परिषदेमध्ये चालू असलेल्या बदल्यात ही कमालीचा गोंधळ चालू असल्याचे उपोषणकर्त्यानी निवेदनाद्वारे व्यक्त केले आहे.