
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा शहरांच्या विकासासाठी तळमळ असणारे नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून अमोल सावकार व्यवहारे यांना ओळखले जाते आज त्यांचा वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
लोहा न.पा.चे स्वीकृत सदस्य असलेले नगरसेवक अमोल सावकार व्यवहारे यांना इतर १७ नगरसेवका प्रमाणे वार्ड नाही ते लोहा न.पा. चे स्वीकृत सदस्य असल्यामुळे ते लोहा न.पा.चे व संपुर्ण लोहा शहरांचे नगरसेवक आहेत ते सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय धार्मिक क्षेत्रात सदा अग्रेसर राहतात.
नगरसेवक अमोल व्यवहारे यांचा जन्म महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या परळी वैजनाथ येथील व्यवहारे कुटुंबांत झाला आई वडिल हे सुशिक्षित असुन घरी जमिन जायजाद व्यापार चांगल्या प्रकारे असुन ते टामटुम आहेत अमोल सावकार व्यवहारे यांचें शालेय शिक्षण परळी येथील वैद्यनाथ विद्यालयात झाले .व पुढील उच्च पदवी पर्यंत चे शिक्षण घेण्यासाठी लोहा येथे दाखल झाले नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी हे त्यांचे सख्खे माऊस भाऊ असुन ते लोहा येथे मावशीच्या घरी राहून त्यांनी आपले लोहाच्या श्री संत गाडगे महाराज विद्यालयात पदवी पर्यंत चे शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण पुर्ण झाल्यानंतर नौकरी च्या मागे न लागता सामाजिक व राजकीय क्षेत्रात ते दाखल झाले तसेच ते नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या शेती, कॉम्प्लेक्स बांधकाम आदी कारभार पाहू लागले त्यांनी परळी ही जन्मभूमी असली तरी कर्मभूमी म्हणून ते लोहा शहरात स्थायिक झाले लोहयाचे रहिवासी झाले.
त्यांच्याकडे जिद्द चिकाटी मेहनत परिश्रम घेण्याची कार्यकर्ते जोडण्याची कला आहे. लोहा शहरातील प्रत्येक वार्डाचा त्यांना खडानखडा खडा माहिती लोहा न.पा. व शासनाच्या च्या ज्या ज्या योजना आहेत त्यांचा लाभ लोहा शहरातील नागरिकांना मिळाला पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात अनेकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देतात लोहा शहरातील नागरिकांना नाव परिवर्तन, गुंठेवारी, बांधकाम परवानगी, घरकुले आदी कामे करण्यासाठी सतत मदत करतात नगरसेवक अमोल व्यवहारे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला असल्यामुळे ते लोहा शहरांमध्ये लोकप्रिय नगरसेवक म्हणून ओळखले जात आहेत.
नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांना कामकाजासाठी सतत मदत करणे शहरातील विविध विकास कामे मंजूर करण्यासाठी मुख्याधिकारी, अभियंता यांना अंदाज पत्र तयार करायला लावणे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांच्यात समन्वय साधणे शहरात विविध विकास कामे मंजूर करुन ते दर्जेदार गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे यासाठी नगरसेवक अमोल सावकार व्यवहारे हे प्रयत्नशील असतात त्यांच्या या विधेयक कामाबद्दल ते लोकप्रिय नगरसेवक झाले असून लोहा न.पा.त त्यांच्या शब्दाला फार मोठी किंमत त्यांनी शहरातील अनेक नागरिकांचे कामे नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या माध्यमातून केले आहे शहरातील जवळपास ९५ टक्के जनता मानते फक्त त्यांच्यावर ४ ते ५ टक्के विरोधक जळतात पण ते कुणालाही द्वेष ने पाहत नाहीत लोकशाहीत काही जण विरोध करतात किती कामे चांगले केले तरी ना आवडीचे मिठ आळणी या म्हणीप्रमाणे जलनेवाली की ही दुवा आपने साथ है उपरवाला व जनता हमारे साथ असे म्हणत नगरसेवक अमोल व्यवहारे यांचे कार्य सुरू आहे.
आज दिनांक २५ मे रोजी लोहा शहरातील सर्वांचे लाडके नगरसेवक असणारे अमोल सावकार व्यवहारे यांचा वाढदिवस असुन ईश्वर त्यांना चांगले निरोगी आरोग्य देवो त्यांच्या हातून नियमित जनसेवा घडो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा
विलास सावळे
लोहा