
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
जळकोट तालुक्यातील अतनूरसह २२ गाव-वाडी-तांडा परिसरातील ग्राहक त्रस्त ! अतनूरात चार कंपन्यांचे टॉवर शोभेची वस्तू
उदगीर विधानसभा मतदारसंघ व जळकोट तालुक्यातील अतनूरसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल नेटवर्क सेवा विस्कळीत झाली असून मोठ मोठ्या रकमेचे रिचार्ज करून मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप करावा लागत आहे. नेटवर्कसंदर्भात त्वरित दुरूस्ती नाही केल्यास शिवसेनेने व युवासेनेने टॉवर जमीनदोस्त करण्याचा इशारा विविध कंपन्यांन्या निवेदनाद्वारे युवासेनेचे जळकोट तालुका सरचिटणीस तथा शिवसेना घोणसी विभाग प्रमुख मुक्तेश्वर येवरे-पाटील अतनूरकर यांनी दिला आहे.
अतनूर गावात चार कंपन्यांचे टॉवर असून ते टॉवर शोभेची वस्तू झाली आहेत. बीएसएनएल, आयडिया, वोडाफोन, एअरटेल, जिओ, वीआय सह कंपन्यांची ग्राहक संख्या अतनूरसह परिसरातील २२ गाव-वाडी-तांडा परिसरात मोठी आहे. सध्या मोबाइल स्क्रीन वर रेंज दिसते. परंतु कॉल लागत नाही. दहा वेळेस प्रयत्न करून फोन न लागणे, फोन लागल्यावर चित्रविचित्र आवाज येणे, फोन मध्येच कट होणे अशा अनेक तक्रारी या नेटवर्कसंदर्भात ग्रामस्थांना सतावत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून चालू असलेल्या प्रकारामुळे रेशन दुकानदारांनाही पॉझ चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने ग्राहकांना कित्येक वेळ दुकानासमोर ताटकळत बसावे लागत आहे. एक तर या कंपन्यांचेे कुठलेच संपर्क कार्यालय स्थानिक व तालुकास्तरावर नसल्याने संपर्क करावा तरी कोणाशी असा प्रश्न ग्राहकांनासह अनेकांना पडला आहे. महत्त्वाच्या कामानिमित्त फोनच लागत नाही. ग्राहंकाचे हजारो रुपयाच केलेले रिचार्ज वाया जात आहे. संबंधित कंपन्यांनी आपल्या नेटवर्कची गुणवत्ता सुधारणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील कमकुवत नेटवर्कमुळे बँकिंग सेवा, सेतू सुविधा केंद्रा ऑनलाइनच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करणारे छोटे-मोठे व्यापारी व ऑनलाइन अभ्यास करणारे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. पोर्टल करण्यावर भर
सध्या ग्रामीण भागात प्रत्येक तरुणाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे. सोशल मीडियाचा तुफान वापरामुळे तरूणाईस आकर्षित करण्यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून नेट, कॉलिंग मोफत असल्याचे आमिष विविध कंपन्यांकडून देण्यात येते याचाच एक भाग पोर्ट आऊट करून कंपनी बदलून घेण्याची स्पर्धा लागली आहे.
नेटवर्कच्या बाबतीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हा संघटक बालासाहेब शिंदे अतनूरकर यांनी वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. तसेच युवा सेनेचे जळकोट तालुका सरचिटणीस तथा शिवसेनेचे घोणसी विभाग प्रमुख मुक्तेश्वर येवरे-पाटील यांनी टॉवर जमीनदोस्त करण्याची व पाडण्याचे निवेदन इशारा विविध कंपन्यांन्या दिले आहे.