
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
बुलढाणा :दि.२५. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ञ आज दिनांक २५ मे रोजी बुलढाणा येथे आले आहे.भाजपा जिल्हा महामंत्री डॉ. योगेंद्र गोडे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय परिसरात हा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले असता त्यांनी संवाद साधला. यंदा पेरणी लवकर होणार आहे पाऊस अवघ्या बारा दिवसांवर आला आहे. यंदा सोयाबीनच्या झडती चांगली येईल असेही ते यावेळी म्हणाले. अजून चार-पाच दिवस विदर्भात व बुलढाणा जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहील. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणी पूर्वीचे काम लवकर उरकून घ्यावे. पेरणीसाठी बी बियाणे खते आणून ठेवावे. मान्सून आता समुद्रात आला आहे पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे यंदा पेरणी लवकर होईल. बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी जून महिन्यात होईल तर उरलेल्या शेतकऱ्यांची पेरणी जुलै महिन्यात होईल असेही ते म्हणाले. यंदा सगळी पिके जोमाने येणार आहेत. ऑगस्ट महिन्यात भरपूर पाऊस होईल. सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असेही पंजाब डख म्हणाले.
*२८ ऑक्टोबर नंतर थंडीला सुरुवात*
यंदा २८ ऑक्टोबर नंतर थंडीला सुरुवात होणार आहे २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर पर्यंत गहू व हरभरा पिकाची पेरणी होईल असा अंदाज असलेले पंजाब डख म्हणाले. जेव्हा पाऊस लवकर येतोय पेरण्या लवकर येतात तेव्हा पिकाची झडती चांगली असते. यांना सोयाबीनला चांगली झडती येईल शेतकऱ्यांनी चांगल्या बियाण्याची निवड करावी. मशागत चांगली करावी व खते आणि औषधे वेळेवर द्यावी असेही ते म्हणाले. बुलढाणा येथे योगेंद्र गोडे यांनी सुरू केलेले उपक्रम आदर्श आहेत. शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा घेण्याची त्यांची संकल्पना त्यांची शेतकऱ्यां प्रति असलेली तळमळ दाखवते अशी पंजाब डख म्हणाले.