
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : दि.२६/५/२०२२ रोजी पुणे शहरातील पर्वती, लष्कर, SNDT, होळकर व वारजे पाणी पुरवठा झोन अंतर्गत दुरुस्ती निमित्त पूर्वी पाणी बंद (Closure)जाहीर करण्यात आला होता. परंतु मा. राष्ट्रपती यांच्या नियोजित पुणे दौऱ्यामुळे आता ती सूचना रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच आता सदर च्या सर्व भागांमध्ये दिनांक २६/५/२०२२ रोजी नेहमी प्रमाणे पाणी पुरवठा सुरू राहणार आहे.
असे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर
(पाणी पुरवठा-
पुणे महानगरपालिका) यांनी कळविले आहे.