
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
खामगाव:दि.२५. पिंपरी गवळी येथे पिसाळलेल्या कुत्र्याची एका माणसाशी चाळीस मिनिटे सिनेस्टाईल झुंज देत कुत्र्याला ठार मारले या झुंजीत माणूसही जखमी झाला.
खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी येथील शेतमजूर रामदास चौधरी वय पन्नास वर्ष हे सकाळी सात वाजता गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात मजुरीसाठी गेले असता दुपारी एक वाजता वेळी शेतातील कामे पूर्ण झाल्यावर घरी परत येत असताना रस्त्यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांनी त्यांच्यावर एकदम हल्ला चढवून हाताला चावा घेतला.चौधरी हे यावेळी घाबरले परंतु न डगमगता त्यांनी कुत्र्याला मारण्यासाठी दगड घेतला असता कुत्र्याने परत त्यांच्यावर हल्ला केला. स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न केला तर पुन्हा हाताला चावा घेतला. कुत्रा एवढा चवताळला होता की पुन्हा पुन्हा उंच उडी मारून त्यांचा नरडा पकडण्याचा प्रयत्न करीत होता. स्वताला वाचण्यासाठी त्यांनी प्रतिकार सुरू ठेवला. दोघे एकमेकावर तुटून पडले कधी कुत्रा खाली पडत असे तर कधी रामदास चौधरी. नंतर रामदास चौधरी यांनी कुत्र्याला पकडून खाली पाडले व एका हाताने त्याचा गळा आवळला दुसऱ्या हाताने मोठा दगड मारून वार केले. त्यात कुत्रा गतप्राण झाला. रखरखत्या उन्हात घरी परतले असता त्वरित सरकारी दवाखान्यात नेले. त्यांच्यावर उपचार करून तब्येत ठीक असल्याचे कळले. पन्नास वर्षे वयात त्यांनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.