
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
परतूर: नगरपरिषदेने अतिशय क्लेशदायक कृती करत, परतूर शहरातील एका गल्ली ला चक्क पाकिस्तान गल्ली असे नाव घेऊन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला असून याविरोधात तात्काळ गंभीर दखल घेत शासन व प्रशासनाने संबंधितावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हे दाखल करीत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे
गेल्या पंचवीस वर्षापासून परतुर ची नगरपालिका काँग्रेसच्या हाती असून अशा प्रकारचे हे षड्यंत्र झाल्याने काँग्रेसला काय परतूर शहरात पाकिस्तान निर्माण करायचा आहे काय असा संतप्त सवाल माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित केला आहेराजकारणात इतक्या घाणेरड्या स्तरापर्यंत जाऊन अशी कृती करणारे दोषी मग कोणी असून कर्मचारी असो राजकारणी असो यांची कुणी या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे अशा प्रकारची मागणी लोणीकर यांनी केली आहे .विकासाच्या बाबतीमध्ये बोंबाबोंब स्वच्छतेच्या बाबतीत मध्ये कुठलीही भूमिका न घेणारे नगरपालिका त्याच बरोबर पंधरा पंधरा दिवस आठ दिवस नगरपालिकेच्या नळाला पाणी येत नाही या सर्व प्रश्नांना सोडून हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचे षड्यंत्र
ज्यांनी कोणी रचल आहे त्यांना शासन प्रशासनाने मोकळ सोडू नये अशा तीव्र शब्दांमध्ये आमदार लोणीकर यांनी या कृतीचा धिक्कार केला आहे
घरपट्टी पावती देताना पालिकेची ही कृती उघड झाली असून अशा प्रकारचे कृत्य शासाठी विघातक असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे..!