
दैनिक चालु वार्ता नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
टणू तालुका इंदापूर येथील रमेश विठ्ठलराव मोहिते यांच्या राहत्या घरामध्ये आज दिनांक, 25/05/2022 रोजी पहाटेच्या 5:30 या वेळेस कुटुंबातील महिला भगीनी किचनमध्ये जात आसताना घरातील फरशीचा पृष्ठभाग उष्ण झाल्याचे जाणवले आसता सर्व कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आचानक आसा प्रकार झाला कसा. टणू गावामध्ये सर्वकाही चर्चा चालू झाली. सदर याची सर्व माहिती कुटुंब प्रमुख रमेश मोहिते यांनी प्रशासन व सरपंच ,उपसरपंच, पोलीस पाटील, .सर्कल आणि तलाठी यांना लगेच दिल्यामुळे प्रशासन हजर झाले. सर्कल कदम व तलाठी बिराजदार यांनी फोन धोनी द्वारे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना सांगितले आसता. तात्काळ प्रशासनाच्या हालचाली चालू होऊन तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या आदेशाने पोलीस प्रशासन व शासकीय अधिकारी येऊन याची चौकशी केली. सदर या घटनेचा भूवैज्ञानिक मार्फत तपास होई पर्यंत हे कुटुंब तहसीलदारांच्या आदेशाने या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत केले. व त्या ठिकाणी न जाण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या व सतर्क राहण्यास सांगितले
यावेळी बावडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, मंडळ अधिकारी महिपतराव कदम, तलाठी बिराजदार यांनी घटना स्थळाला भेट देऊन घटनेची चौकशी होईपर्यंत कुटुंबाला स्थलांतरित करून घर सील केले. सदर कुटुंब प्रमुख रमेश विठ्ठलराव मोहिते, व मुलगा रविराज रमेश मोहिते, यांच्याकडे मीडिया मार्फत चौकशी केली आसता.हे कुटुंब गेली 13 ते 14 वर्षापासून या ठिकाणी राहात आहे. आसा प्रकार कधीच घडलेला नसल्याचे मीडियाशी बोलताना रमेश मोहिते व रविराज मोहिते यांनी सांगितले. ही घटना कळताच आजूबाजूच्या भागातील ग्रामस्थांनी पहाण्यासाठी गर्दी केली.
राहत्या घराच्या आजूबाजूला आसणाऱ्या इतर सर्व कुटुंबीयांनाही सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत.
टणू गावचे सरपंच सागर मोहिते, पोलीस पाटील शरद जगदाळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तेजस मोहिते ,नीरा-भीमा साखर कारखाना संचालक प्रकाश मोहिते,समीर मोहिते ,नेताजी मोहिते,विकी निंबाळकर,इत्यादी उपस्थित राहून भेट देऊन माहिती घेण्यात आली.