
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मागिल काही दिवसा पासून म्हसळा नगरवासियांच्या पाणी समस्या हा चिंतेचा विषय बनलेला आहे अनेक निवेदन देऊनही प्रश्न काही मार्गी लागत नव्हता त्या मुळे नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्या करीत काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने दि. 23/5/2022 नगरपंचायत समोर अमरण उपोषण करण्यात आले होते या उपोषणाला म्हसळा नगर वासियांनाच मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळालेला होता म्हसळा काँग्रेस व शिवसेने च्या विद्यमान नगर सेवक, श्री डॉ मोईज शेख यांच्या नेत्रत्वखाली नगर सेवक सुफियान हळदे, श्रीमती राखी करंबे श्री सुरेश कुडेकर, म्हसळा ता. शिवसेना प्रमुख, श्री नंदू शिर्के माजी. ता शिवसेना प्रमुख कौस्तुभ करंडे युवासेना प्रमुख, श्रीमती दिपाली कांबळे श्रीमती नाझीमा मुकादम म्हसळा शहर महिला काँग्रेस प्रमुख, जफर हळदे, कृष्णा म्हात्रे, रिजवान मुकादम, अनेक कार्यकर्त्यांनी या उपोषणात सहभाग घेऊन पाणी टंचाई व घनकचरा या समस्या तात्काळ सोडवून नागरिकांची होणारी परवड थांबली पाहिजे ची भूमिका घेतली आणि सत्ताधाऱ्यांना. काँग्रेस आणि शिवसेनेच्या दणक्याने तात्काळ मिटिंग बोलावावी लागली पण ज्या दिवशी मिटिंग बोलावली त्या दिवशी सत्ताधारी पक्षाचे एकही नगरसेवक मीटिंगला सभादालनात हजर नव्हते
नागरिकांच्या समस्या विषयी सत्ताधाऱ्यांना काहीही देणे घेणे राहिले नाही यातून त्यांनाचा नाकर्तेपणा स्पष्ट होतोय म्हणून जे. बी च्या मिटिंग गैरहजर राहिले. आहेत असे मत नगर सेवक सुफियान हळदे यांनी केले काँग्रेस व सेनेच्या उपोषणाला नागरीकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे