
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
चाकूर तालुक्यातील मौजे कलकोटी येथील श्री खंडोबा मंदीराच्या बांधकाम व कलशारोहणासाठी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव वाघ यांनी पुढाकार घेऊन वैयक्तिक ११ हजार रुपयांची देणगी दिली.
यावेळी कलकोटी ग्रामस्थ व देवस्थान कमिटीच्या वतीने श्री उत्तमराव वाघ यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते गणपतराव नितळे ,विष्णू तिकटे,अंकुश बोमदरे,मिसे गुरुजी, नामदेव नितळे लखन नेवाळे, चंद्रकांत नेवाळे , सचिन हेमनर ,सचिन कांबळे,मारोती हेमनर, तुकाराम मुर्के ,वसंत थावरे ,हुल्लापा खडके ,निलाकांत मुद्रासे ,केरबा शेळके,नारायण कांबळे व गावातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती.