
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- कवी सरकार इंगळी
कै.विठ्ठलराव केदार प्रतिष्ठान, देऊळवाडी, ता. उदगीर जि. लातूर यांच्या वतीने दिनांक 24 मे 2012 रोजी उदयगिरी लायन्स रुग्णालय,उदगीर, जि. लातूर यांचे हॉलमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.
सदर समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री. राहुल भैया केंद्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, लातूर जिल्हा परिषद, लातूर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे
अध्यक्ष मा. श्री. श्रीपाल सबनीस, सर हे होते.
सदर कार्यक्रमांमध्ये सिराज करीम शिकलगार यांच्या “गझल तारा” या गझल संग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.यावर्षी या पुस्तकाला मिळालेला २ रा पुरस्कार असून सिराज शिकलगार याना आतापर्यंत १४ पुरस्कार मिळाले आहेत. याप्रसंगी श्री.रामप्रसाद लाखोटिया, अध्यक्ष, उदयगिरी नेत्र रुग्णालय, श्री. विलास सिंदगीकर, सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ, तसेच श्री.रामचंद्र तिरूके, सदस्य, महाराष्ट्र साहित्य परिषद केंद्रीय कार्यकारिणी, आैरंगाबाद तसेच श्री.अंबादास केदार, श्री.रामदास केदार,श्री.एकनाथ केदार व साै.सबनीस ताई श्री.हबीब भंडारे, आैरंगाबाद हे मान्यवर उपस्थित होते.