
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
लोहा येथील सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचाऱ्यांची पत्रकारांस बातमी का छापली म्हणून जिवे मारण्याची धमकी.
लोहा शहरातील पत्रकारांस विरोधात बातमी छापल्या प्रकरणी जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार फौजदारीचा गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण विभागीय कार्यालय नांदेड यांच्याकडे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे लोहा तालुकाध्यक्ष बाळासाहेब बुध्दे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात पत्रकार संरक्षण कायदा झाल्यानंतही पत्रकारावरील हल्ल्यांच्या, धमकीच्या घटना कमी झालेल्या नाहीत त्यामुळे
या कायद्याची कडक आणि कठोर अंमलबजावणी केली जात नसल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.
निर्भीडपणे पत्रकारिता करीत असताना पत्रकारांवर होणाऱ्या दबाव, धमकी, हल्ल्यांपासून संरक्षणासाठी कायदे आहेत. मात्र, आजही सत्य समोर आणण्यासाठी ‘ग्राउंड रिपोर्टिंग’ करणाऱ्या, तसेच विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले होत आहेत. केंद्र सरकारने पत्रकारांच्या संरक्षणासाठी कडक कायदा करण्याची गरज आहे.
पत्रकारांवर हल्ला केल्यास, हिंसाचाराचे कोणतेही कृत्य करील किंवा करण्याचा प्रयत्न करील, हिंसा करण्यास अपप्रेरणा, चिथावणी किंवा त्यास प्रक्षोभित करील अशा कोणत्याही अपराध्यास तीन वर्षे कारावासाची शिक्षा होईल असा राज्यात कायदा झाल्यानंतही पत्रकारावरील हल्ल्यांच्या,दबाव व धमकीच्या घटना घडतच आहेत.
लोहा येथील सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असलेला वनमजूर तुकाराम वाघमारे व वनरक्षक शेख हे दोघे मागील काही वर्षांपासून बांधावर वृक्ष लागवड योजनेतून तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांकडून पैसे घेऊन शासनाच्या विविध योजनांची मस्टरवर बोगस सह्या करून वृक्षलागवड न करताच बनावट व खोटे कामे दाखवून शासनाच्या लाखो रुपयांचा घोळ घालुन वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात त्यांच्या गैरकारभाराची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशीही मागणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बुध्दे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
लोहा शहरातील सामाजिक वनीकरण विभागात मागील अनेक वर्षांपासून प्रभारी अधिकारी असल्यामुळे येथील कर्मचारी मनमानी कारभार करत आहेत वनमजूर व वनरक्षक मागील अनेक वर्षांपासून याच तालुक्यात कार्यरत असुन त्यांचे अनेक राजकीय नेते व गुन्हेगारी वृत्तीच्या क्षेत्रांशी हितं संबंध आहेत,बातमीच्या माध्यमातून त्यांच्या कार्यालयांच्या भोंगळ व गैरकारभाराची बातमी छापून पोलखोल केल्याबद्दल माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती तालुकाध्यक्ष बाळासाहेब बुध्दे यांना कार्यालयात बोलावून जेष्ठ पत्रकार सुरेश महाबळे, विश्वनाथ कांबळे व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गोडबोले यांच्या समक्ष वनमजूर यांनी वरिष्ठांनी सांगितल्या प्रमाणे तु कोण? कसला पत्रकार आहेत ?तुला मी घरी येऊन अश्लिल भाषेत शिविगाळ करून
मी काय लांबचा नाही ?स्थानिकचा आहे ? माझी नोकरी राहिली काय आणि गेली काय ?तुला बघून घेईन? अशा शब्दात जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
सामाजिक वनीकरण
विभागातील कर्मचा-याकडुन मला व माझ्या कुटुंबाला धोका आहे माझ्या जिवास काही बरेवाईट झाल्यास वनमजूर, वनरक्षक व सामाजिक वनीकरण विभाग मुख्य जबाबदार राहतील असे पुढे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विभागीय वनाधिकारी साहेबांनी सदरील प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यावी अन्यथा संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यात तिव्र आंदोलने केली जातील.असा इशारा संघटनेने दिला आहे.निवेदनाच्या प्रती मा.जिल्हाधिकारी विपिन ईटनकर जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड,मा.जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय नांदेड,मा.खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,मा. खासदार सुधाकर श्रृंगारे लातूर,मा.आमदार श्यामसुंदर शिंदे लोहा/कंधार विधानसभा,मा.तहसीलदार व्यंकटेश मुंढे तहसील कार्यालय लोहा,मा.पोलीस निरीक्षक संतोष तांबे पोलीस स्टेशन लोहा आदींना पाठवलेल्या आहेत.