
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
एवढा मोठा विकास कामाचा निधी बावडा परिसराला दिल्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे बावडा येथील जाहीर सभेत काय बोलणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
बावडा तालुका इंदापूर येथे शुक्रवार दिनांक 27/5/2022 रोजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभ हस्ते एकूण 69 कोटी रुपये विविध विकास कामाचा
भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न होणार, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, व कार्यक्रमाचे अध्यक्ष , प्रदिप गारटकर पुणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे,
प्रमुख पाहुणे प्रताप पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रवीण माने माजी सभापती, प्रशांत पाटील माजी सभापती, हानुमंत कोकाटे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, नवनाथ रुपनवर तालुका उपाध्यक्ष, अभिजीत तांबिले सदस्य जिल्हा परिषद, सचिन सपकाळ, दीपक जाधव, बापुराव शेंडे, छायाताई पडसळकर, शुभम निंबाळकर, बाळासाहेब करगळ, दत्तात्रय घोगरे, नरहारी काळे, चंद्रकांत सरवदे, श्रीकांत दंडवते, पांडुरंग डिसले, दादासाहेब डिसले, सोमनाथ मोहिते, श्रीकांत बोडके, सुनील जगताप, संतोष सुतार, सुदर्शन बोडके, व सर्व सन्माननीय सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य संचालक समस्त ग्रामस्थ बावडा व परिसरातील पदाधिकारी आणि मान्यवर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वच भागातील कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार. विविध विकास कामाचे उद्घाटन व बावडा बाजार तळ येथे सायंकाळी 6 वाजता जाहीर सभेसाठी सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहणार असून.69 कोटी रुपयाची पुढील प्रमाणे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न होणार (1) बावडा नरसिंहपूर रस्ता लोकार्पण 57 कोटी रुपये (2) बावडा ते गणेशवाडी रोड चौपदरीकरण 4 कोटी रुपये (3) बावडा ते भांडगाव रस्त्यावरील पूल 3 कोटी रुपये.(4) बावडा ते गणेशवाडी ते गारअकोले रस्ता 2 कोटी रुपये (5) तसेच इतर सर्व 3 कोटी रुपयांची विविध विकास कामे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ आसून एकूण विकास कामे रक्कम रुपये 69 कोटींची आहेत. या सर्वच कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न होणार आसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका आध्यक्ष हानुमंत कोकाटे बोलत होते.