
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ तांबेकर
:-मौजे ईरेगाव येथे राष्ट्रसंत भीमा भोई यांची गावातील भोई समाजाच्या वतीने दि२६/०५/२०२२ रोजी सकाळी अकरा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.या कार्यक्रमाचे आयोजन भोई समाजाच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ लछम्मा मागीरवाड ईरेगाव,उद्घाटक नारायण पिराजी गटल वाड,तर प्रमुख पाहुणे बालाजी तोकलवाड,संरपच सौ. रत्नमाला अमोल गोरे, उपसरपंच राम घंटलवाड,पत्रकार दशरथ आंबेकर,ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका सौ निर्मला गंगाधर.मागीरवाड. व गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते.प्रमुख मार्गदर्शक राजु शिरपुरे जिल्हाध्यक्ष भोई समाज संघटना नांदेड,गजानन मोजे तालुका अध्यक्ष भोई समाज संघटना किनवट हे यावेळी उपस्थित होते.राष्ट्रीयश्री संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन व विविध महापुरुषांच्या फोटोचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यातआले. या कार्यक्रमाला भोई समाजातील विविध कर्मचारी, पदाधिकारी, समाज बांधव,महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर शेवटी गावातुन प्रमुख मार्गाने मिरवणूक निघाली होती.