
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
अहमदपूर तालुक्यातील येस्तार, पार ,शेनकुड ,टाकळगाव या चार गावची विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध झाल्याने सर्व नुतन संचालकांचा सत्कार भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
तालुक्यातील येस्तार, पार, शेनकुड, टाकळगाव या चार गावची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालकपदाच्या १३ जणांची बिनविरोध निवड करण्यात आली असून नवनिर्वाचित संचालकांचा माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी सत्कार करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
बिनविरोध संचालकामध्ये पोले दतात्रय , रामभाऊ नरवटे, राजू ढाकणे , भगवान ढाकणे , ज्ञानोबा ढाकणे, सौ केवळबाई ढाकणे, सौ कौसल्याबाई ढाकणे, संजय श्रीमंगले , सूर्यकांत राजपंगे , मंगेश नागरगोजे , संतोष नागरगोजे , नागोराव चव्हाण, ईश्वर नरवटे या सोसायटीच्या सर्वच्या सर्व १३ जणांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल येथील शासकीय विश्रामगृहात सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य परमेश्वर घोगरे ,गोविंदराव गिरी राजू खंदाडे , प्रशांत शिंदे ,संजय ढाकणे, तुकाराम ढाकणे, ह.भ.प.पवण महाराज ढाकणे यांच्यासह येस्तार,पार,शेनकुड,टाकळगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.