
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
पशु,पक्षी,जणावरे यांचेसह नदीकाठावरील गावांना मोठा दिलासा…
नांदुरा: दि.२६.
आज पुर्णा नदिला हनुमान सागर या वान नदिवरीवल प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले, त्यामुळे पुर्णा नदि भर उन्हाळ्यात झुळझुळ वाहू लागली. पावसाळ्यात काठोकाठ वाहणारी नदी उन्हाळ्यात मात्र कोरडी होवून जाते. नदी कोरडी पडल्यामुळे नदिकाठावरीवल गावासह, पाण्याच्या सहाऱ्याने नदीकाठी राहणारे पशु,पक्षी,जणावरे यांना भर उन्हाळ्यात त्याचा मोठा फटका बसतो, पण या वर्षा ऐन उन्हाळ्यात पाणी सोडल्यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे असे असले तरी, पुर्णा नदिवरील रेतीघाट घेणाऱ्या मालकांना याचा मोठा आर्थिक फटका बसनार आहे. एकतर यावर्षी रेतीघाटाचा लीलाव उशिरा झाला त्यामुळे रेती वाहण्यासाठी घाटमालकांना जेमतेम दोन महिण्याच्या आसपास कालावधी मिळाला. त्यातच दरवर्षी पेक्षा या वर्षी रेतीघाटाच्या लीलावासाठी मोठी किंमत मोजा लागली. परंतु पुर्णा नदिला पाणी सोडल्याने रेतीघाट मालक मोठ्या संकटात सापडले आहे. रेतीघाटासाठी दिलेली मुळ रक्कमही निघत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्यातच माऊली, गोळेगाव हुरसाळ या रेतीघाटाचा लीलाव या वर्षी झाला नसल्याने त्या घाटात रेतीमाफायांनी अक्षरशः हैदोस घातला होता. रेतीतस्करांना अटकाव घालण्यासाठी महसुल प्रशासनाच्या नाकिनऊ आले होते. महसूल प्रशासनाकडून या रेतीचोरांवर पाहिजे तशी कार्यवाही या वर्षी झाली नाही. त्यामुळे कुंपनच शेत खाते की काय ? काहिशी अशी परिस्थिती जळगाव जामोद महसुल प्रशासनाची परिस्थिती यावर्षी पहायला मिळाला. परंतु वान धरणातून पाणी सोडल्यामुळे या येतीचोरांचे सुद्धा धाबे दनानले आहे, त्यामुळे रेतीमाफियावरही लगाम बसला आहे. एकंदरीत पुर्णा नदिला पाणी सोडल्यामले कभी खुशी कभी गम सारखी सोडल्यामुळे कभी खुशी कभी गम सारखी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. असे असले तरी पाणी ही जीवनावश्यक गरज आहे. पाण्याशिवाय जगणे अशक्य आहे. त्यामुळे पुर्णा नदिला पाणी सोडल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. एवढे मात्र खरे.