
दैनिक चालु वार्ता नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
टणु तालुका इंदापूर येथील आचानक घरातील गरम झालेल्या 2 परशाचा तपास लागला.टणु येथील मोहिते कुटुंबातील रमेश विठ्ठलराव मोहिते मुलगा रविराज रमेश मोहिते यांच्या घरामधील अचानक गरम झालेल्या दोन फर्षाचा तपास उघडकीस आला. तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या आदेशामुळे मंडळ अधिकारी महिपतराव कदम तलाठी बिराजदार यांनी टणु यथील सील केलेल्या घराचा प्रश्न मार्गी लागला.
कुटुंब प्रमुख रमेश मोहिते व रविराज मोहिते यांच्याकडील मिळालेली माहिती आशी आहे की प्रशासनाने आमचे घर शील केले होते. परंतु भीतीमुळे इतरांचे सहकार्य घेऊन टणु गावचे सरपंच सागर मोहिते, विकी घोगरे, पांडूरग मोहिते, नितीन मोहिते, यांनी धाडस करून सील केलेल्या घरामध्ये रात्री 12 वाजता प्रवेश केला. सदर तपास घेत आसताना फरशीच्या पृष्ठभागावर इलेक्ट्रिक टेस्टर लावल्याने तो लगेच लागत होता तर घरामधील इलेक्ट्रिक सप्लाय बंद केली आसता टेस्टर लागू शकत नाही असे आढळून आले. पुढील ठिकाणी किचन मधील सिलिंग फॅनचा स्टार्टर शॉर्टसर्किट झालेला हे सिद्ध होऊन फरशी खालील भागात बांधकामाचे लोखंडी स्टील आसल्यामुळे फरशी खालील भागामध्ये कोयल तयार झाली. त्यामुळे फरशी गरम आहे हे आढळून आले. शॉर्टसर्किट काढल्यामुळे फरशी थंड होऊन पाहल्याप्रमाणे घरातील सर्व कुटुंब शुक्रवारी रात्री प्रवेश करून राहण्यास सुरुवात केली.