
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा :दि.२६. नांदुरा तालुक्यातील अपंग बांधवाने रेशन कार्डसाठी नांदुरा तहसील ला अर्ज केलेला आहे. परंतु अद्याप रेशन कार्ड मिळाले नाही अशा सर्व अपंग बांधव/दिव्यांग/विधवा नागरिकांना महिलांना नांदुरा तहसील कार्यालयात दि.२६ मे रोजी रेशन कार्ड वाटप होते. १५० रेशन कार्ड तयार सुद्धा आहेत. परंतु तहसीलदार साहेब कामानिमित्त सुट्टीवर असल्याने कार्ड वाटप होऊ शकले नाही.तर कार्ड वाटपाची तारीख दि.३० मे सोमवारला सकाळी ११ वाजता पांडव मंगल कार्यालयात मिशन वासल्य अंतर्गत या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व १५० कार्ड अपंग, दिव्यांग, विधवा यांना मलकापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. तसेच
१)ज्यांचे अपंगत्व ४० टक्केपेक्षा जास्त आहे त्यांच्या रेशन कार्ड वर कोणत्याच माल मिळत नाही असे अपंग.
२)ज्या महिला विधवा आहेत त्यांना कोणताच आधार नाही व आतापर्यंत कोणताच माल मिळत नाही अशा विधवा महिला.
३) तसेच ज्या महिला परीपक्त्या (घटस्फोटीत) आहे त. कोर्टाचा पुरावा आवश्यक.
अशांनी अर्ज केले नसतील तर त्वरीत तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय नांदुरा यांच्या नावाने वाईंडर मार्फत अर्ज करावे. सदर कागदपत्रे करत असताना कोणी जर पैशाची मागणी करत असेल तर तहसीलदार साहेब नांदुरा किंवा
वसंतराव भोजने :९८२२०३९७९९
ईश्वर पांडव: ८८८८१६१२१४
यांच्याशी संपर्क साधावा.