
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा: दि.२७ .कर्करोग ही भारतासह जगासमोरची एक प्रमुख समस्या आहे. दरवर्षी लाखो लोकांना कर्करोगानं आपला जीव गमवावा लागतो. बदलती जीवनशैली, भेसळयुक्त आहार, व्यसनं आदी कारणांमुळे कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येतं. याचे जास्त प्रमाण महिला व वयोवृध्द मध्ये दिसुन येत आहे.
कुटुंबातील घर सांभाळणाऱ्या माता भगिनी यांना जर कॅन्सरचे लक्षणे आल्यास सर्व कुटुंब खचून जावुन संकट निर्माण होते. म्हणून या महिला भगिनी यांचा विचार व काळजी करुन व त्यांना यापासुन त्वरित उपचार करण्यास मदत होण्याकरिता
नांदुरा शहरात प्रथमच भाजपा महिला मोर्चा नांदुरा शहर अध्यक्षा सौ.सारीकाताई राजेश डागा यांच्या प्रयत्नातुन कर्करोग रुग्ण तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्या सहकार्याने कॅन्सरमुक्ती महाराष्ट्र अभियानातंर्गत मोफत कर्करोग तपासणी शिबीर दिनांक २६ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्व.हरिभाऊ पांडव मंगल कार्यालय नांदुरा येथे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये अत्याधुनिक “मोबाइल कॅन्सर डिटेक्शन बस” च्या माध्यमातून मेमोग्राफी मशीन, डिजिटल एक्सरे, पैथोलॉजी लैब, सीबीसी मशीन, C R मशीन, डेंटल चेकअप चेयर आदि अत्याधुनिक यंत्रना व्द्वारे स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि ब्राँकायटिस कर्करोग च्या तपासण्या करण्यात आल्या या तपासणी करिता बाहेर ठिकाणी अंदाजे ८ ते १० हजार रु खर्च येतो. परंतु या शिबिरात ह्या सर्व तपासण्या विनामुल्य करण्यात आल्या.
या कर्करोग शिबीराचे उद्घाटन भाजपा नेते व मलकापूर मतदारसंघाचे आधारस्तंभ मा.आ.चैनसुखजी संचेती व डॉ.गोठी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नांदुरा शहरातील भाजपाचे सर्व मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्याने आयोजन करण्यात आले.
या कॅन्सर मुक्त अभियान शिबिरामध्ये ११०लोकांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच या ठिकाणी अनेक मान्यवर नेत्यांनी तसेच डॉक्टर यांनी भेट दिली व शिबिराचे योजनेचे कौतुक केले.