
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे.
नांदुरा: दि.२७ नवीन इसरखेड येथील दलित वस्तीमध्ये पिण्याचे पाण्यासाठी पाईपलाईन करा तसेच सचिव शिवदे यांचेवर कारवाई करा अशा आशयाचे निवेदन दिनांक २७/५/२०२२रोजी तहसीलदार नांदुरा यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्व इसरखेड नवीन येथील कायम रहिवासी असून आम्ही सर्व अनुसूचित जातीचे लोक आहोत. त्यानुसार आमच्या वस्तीत अद्याप सुध्दा पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन केलेली नाही गावात सार्वजनिक नळ नाही त्यामुळे गावातील गोरगरीब वंचित दीनदलित लोकांना मुख्य पाईपलाईन वरुन घरी नळ घेणे शक्य नाही. गावातील मुख्य पाईपलाईन ही दलित वस्तीपासून तीनशे ते चारशे फूट लांब आहे वास्तविक प्रामुख्याने शासनाचे हर घर जल असे धोरण आहे परंतु या ठिकाणी याला हरताळ फासण्याचे काम ग्रामपंचायत पदाधिकारी व सचिव करित आहे.याबाबत गावातील नागरिकांनी संबंधित सचिव यांचेकडे विचारणा केली असता ते गावातील महिला पुरुष यांना अरेरावीची भाषा वापरुन उर्मटपणे उध्दट वागणूक देतात व ग्रामपंचायतचा पाणीकर घरकर वसुली नाही त्यामुळे मी काही करू शकत नाही तुम्हाला काय करायचे असे खडसावून सांगतात वास्तविक येथील मागासवर्गीय असलेल्या लोकांनी पाणीकर घरकर वसुली दिलेली आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी समस्या भिषण आहे परंतु येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व सचिव यांना काही देणेघेणे नाही. त्यामुळे दलित वस्तीमध्ये पिण्याचे पाण्याची भिषण समस्या आहे.तरी येथील दलित वस्तीमध्ये पिण्याचे पाण्याची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन त्वरित करा व गावकऱ्यांना मुद्दाम उर्मटपणे उध्दट वागणूक देणाऱ्या सचिव शिवदे यांचेवर कारवाई करा असे नमूद आहे. निवेदनावर संदिप खंडारे, विजय खंडारे,गजानन खंडारे,अजय खंडारे, कैलास मुंडे,देविदास तायडे,शेषराव बजरे,शालिग्राम थेरोकार,कैलास कांडेलकर,सतिष कांडेलकर,सदाशिव रावणचवरे,आदिंंच्या सह्या आहेत.