
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी-रामेश्वर केरे
गंगापूर तालुक्यातील सिरेगाव येथे वारकरी संप्रदायाच्या वतीने एकवीस दिवशीय बालसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आलेले होते.पाच दिवसांच्या हरीनाम सप्ताहाने शुक्रवारी दि.२७ रोजी दुपारी सांगता झाली.यावेळी ह.भ.प. नंदू महाराज फांदाडे यांचे अतिशय सुश्राव्य असे काल्याचे किर्तन झाले. डॉ.गणेश जाधव सध्या वेगवेगळ्या 23 झाडांच्या बीया लग्न समारंभ,हरीनाम सप्ताह, वर्षश्राध्द यासारख्या सार्वजनिक कार्यक्रमात वाटप करीत आहेत.वेळोवेळी त्यांना दुर्मीळ अशा बीया उपलब्ध करून देणारे मराठा सेवा संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष राजूदादा खिल्लारे डोणगावकर , डॉ.गणेश जाधव सरांचे सहाय्यक अजय गायकवाड , दादासाहेब पाटील तायडे असे चौघेजण शिरेगाव येथील सांगता कार्यक्रमात उपस्थित राहीलो. यावेळी डॉ.गणेश जाधव अतिशय सोप्या व मोजक्या शब्दात वृक्ष लागवड व निसर्ग संवर्धन हा विषय उपस्थितांना समजावून सांगत प्रत्येकी 23 बीयांच्या प्लास्टिक पन्नीतून हजारो बीया वाटप केल्या.