
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई– भाजपने वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपने माजी मंत्री कृषी मंत्री अनिल बोंडे आणि मोदी सरकारमध्ये विद्यमान मंत्री असलेल्या पियूष गोयल यांच्यासह धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, तिसऱ्या जागेसाठी विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा रंगली होती. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी राज्यसभेची निवडणूक आता रंगतदार होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माजी मंत्री विनोद तावडे यांचा पुन्हा एकदा पत्ता कट झाला आहे. गेल्या काही दिवसापासून विनोद तावडे यांना उमेदवारी मिळणार, अशी चर्चा होती, पण ऐनवेळी त्याचा पत्ता कट झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विनोद तावडे यांना डावलून माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना भाजपने संधी दिली आहे. अनिल बोंडे हे देवेंद्र फडणवीस गटातले असल्याने त्यांना संधी दिल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.