
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जम्मू : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची ईडीने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणी मंगळवारी (ता. ३१) तीन तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. हे प्रकरण जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित आहे.
श्रीनगरचे लोकसभा खासदार अब्दुल्ला सकाळी ११ वाजता राजबाग येथील ईडी कार्यालयात पोहोचले. माजी मुख्यमंत्र्यांनी आत जाण्यापूर्वी पत्रकारांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी काही आरोपही केले.