दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागातील प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. सोनवणे हे बुधवारी (दि.1 जून) प्र-कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांचा कार्यकाल संपुष्टात आला होता. त्यानंतर राज्यपालांनी प्रभारी कुलगुरू म्हणून लोणेरे येथील तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे पुणे विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. परंतु प्र-कुलगुरू पद रिक्त होते. त्या ठिकाणी आता डॉ. संजीव सोनवणे हे प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत.


