
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यांचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागांचे कर्तव्यदक्ष पोलिस उपअधीक्षक माननीय अशोक शिर्के साहेब हे दिनांक ३१ मे रोजी आपल्याला ३७ वर्षाच्या नंतर सेवेतून सेवानिवृत्त झाले. सामाजिक भान जपणारा अन्यायाविरुद्ध लढणारा अधिकारी म्हणून पोलिस विभागांत त्यांचे नाव अनेक वर्ष चर्चेत राहिले सातारा जिल्ह्यांमध्ये त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागांमध्ये त्यांची कर्तव्यदक्ष ही सेवा सातारकरांसाठी आठवणीत राहणार त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. सोमवारी दिवसभरांत अशोक शिर्के साहेबांना सातारा जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी व सातारा जिल्ह्यातील त्यांचे सर्व सहकारी मित्र यांनी समक्ष व सोशल मीडियावरुन त्यांचे अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांनी साहेब केलेल्या कामाची पोच पावती,म्हणून तुमची आठवण ही सातारकरांना नक्कीच राहील अशा शब्दांत पुरीगोसावी सदिंच्छ भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.