
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबादच्या मराठवाडा संस्कृतीक मंडळावर ८ जून रोजी सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी औरंगाबादेतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि नेते करीत आहे. आज सकाळी सभास्थळावर शिवसेनेच्या वतीने स्तंभपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मागच्या महिन्यात याच मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन चांगलेच राजकारण तापवले होते. त्याचे पडसाद अनेक दिवस राज्यभर पडताना आपल्याला दिसले. आता या मुद्द्यावर उद्धव ठाकरे काही बोलणार का ?, औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरुन विरोधकांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. यावर ठाकरे काय बोलणार?, याच मैदानावर बोलताना हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे याबाबत काही मोठी घोषणा करणार का? याकडेही सध्या सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.