
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
चाकूर तालुक्यातील मौजे भाकरवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवा नेते सुमितभैया वाघ यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जयंती समितीच्या वतीने प्रा.डॉ नामदेव सोडगीर यांचे व्याख्यान झाले.
युवा नेते सुमितभैया वाघ यांनी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा युवकाला प्रेरित करणारा इतिहास सांगितला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम जाधव,उस्मानबाद शिक्षण विस्तार अधिकारी दैवशालाताई हाके,सामाजिक न्याय राष्ट्रवादी सेलचे विष्णू तिकटे,अंकुश बोमदरे,मनसे तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,ज्योतीताई हाके,शकूंतलाताई शेवाळे, ॲड ज्ञानोबा हाके,आण्णाराव हाके,हणमंत गडदे,नरेंद्र हाके,निलेश हाके,करण गडदे,शिवाजी हाके,दयानंद गडदे सह गावातील युवक,महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते