
दैनिक चालू वार्ता रायगड म्हसळा प्रतिनिधी -प्रा. अंगद कांबळे
माणगाव येथे श्रमजीवी परिवाराचे 17 वे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन रविवार दि. 29 मे 2022 रोजी कुणबीभवन माणगाव जि रायगड येथे पारपडले आहे या समारंभाचे अध्यक्ष ख्यातनाम साहित्यिक संत वाङमयाचे गाडेअभ्यासक मा. श्री.ऍड. धनराज वंजारी सह्. पोलीस आयुक्त ब्रहमुंबई (सेवा निवृत्त ) रा. अध्यक्ष – नॅशनल डेमोकर्टिक काँग्रेस होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री अमोल द. कुलकर्णी अध्यक्ष भा. ज. पा माणगाव ता., मा. श्री डॉ. नंदकुमार राजपूरकर समाजसेवक, मा प्रकाश काविणकर मार्गदर्शक श्रमजीवी परिवार, मा. श्री मनीष शाह, मा. श्री संजय गो. वाळंज अध्यक्ष कुलस्वामी सह पतसंथा मर्या मुंबई, मा वैभव कार्लेकर मा श्री पुरुषोत्तम मुळे सल्लागार श्रमजीवी परीवार, मा. श्री हरेश काविणकर प्रमुख श्रमजीवी परीवार हे उपस्थितीत पाहुणे क्रीडा, कला, सामाजिक, शैक्षणिक,अश्या क्षेत्रात भरीव असे योगदान देणाऱ्या मान्यवरांस श्रमजीवी पुरस्काराने गौरवण्यात आले सामाजिक कार्यात मा. श्री चंद्रकांत पवार, से नवाज वजीर नजीर मा श्री शांताराम घोले, श्री विठ्ठल दिवेकर, श्री गणेश देवडे, कुणाल येरपल्ले सौ सुमनताई तोंगरे, शिक्षकभूषण या पुरस्काराने प्रा. अंगद प्र. कांबळे, श्री रुपेश गमरे, श्री सावंत गुरुजी कु. लीना अशोक कांबळे, सौ गीतांजली शेळके, श्री अनंत जाधव, हरिदास म्हात्रे,श्री. मिठू आंधळे, श्री सखाराम चोरगे, या मान्यवरांना त्यांच्या कार्यातील कामगिरीच्या योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती