
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
गेली दोन वर्ष कोरोना मुळे पर्यटन बंद होते व गतवर्षी च्या अतिवृष्टी मुळे किल्ले पन्हाळा शहरात प्रवेश करणारा जुना बुधवार पेठ ते जुना प्रवास कर नाका रस्ता दिनांक २३ जुलै रोजी खचल्यामुळे तुरळक प्रमाणात पर्यटक व इतिहास प्रेमी यांची गर्दी होत होती.पन्हाळा नगरपरिषद मार्फत रेडे घाटी मार्गे तयार करणेत आलेल्या पर्यायी रस्ता मार्गे पर्यटकांची काही प्रमाणत गर्दी होत होती.तो रस्ता अडचणीचा व जंगलातून जात असल्यामुळे एकेरी वाहतूक करावी लागत होती. आत्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर मुख्य रस्ता दुरुस्ती पूर्ण झाल्यावर पन्हाळा गडावर पर्यटक व इतिहास प्रेमी यांची विक्रमी गर्दी होत आहे.अक्षरशा पन्हाळगड पर्यटकांनी फुलत आहे.पर्यटकांच्या गाड्या लावण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही एवढे लोक हा गडावर येत आहे. त्याअनुषंगाने पन्हाळा नगरपरिषद प्रवासी कर नाका कडील विक्रमी वसुली होत असून दिनांक २९ मे रोजी एका दिवसात तब्बल १,५५,००० / – इतके प्रवासी कर संकलन झाले .तसेच मे महिन्यात दिनांक १ ते ३१ मे अखेर १७,८०,६३० / – इतके प्रवासी कर संकलन झाले आहे.प्रवासी कर नाक्या कडील सर्व कर्मचारी यांनी अविरत प्रामाणिक महेनत करत वाहतूक नियंत्रणा सुस्थितीत लावत विक्रमी प्रवासी कर संकलन केलेमुळे पन्हाळा नगरपरिषद प्रशासक,तथा मुख्याधिकारी,स्वरूप माणिक खारगे यांनी सर्व कर्मचारी यांचा सत्कार केला.प्रवासी कर विभागाकडील लिपिक विश्वास रामाणे,नाका कर्मचारी सुहास भोसले,गणेश भोसले संजय रनाभिसे,शरद वाघमारे,अरुण कांबळे,दीपक कासे,रवी कांबळे, शिवाजी कांबळे,रवी गवंडी,सचिन काळे यांचा सत्कार करणेत आला.यावेळी,सुभाष पवार,अमित माने,माजी उपनगराध्यक्ष रवींद्र घडेल व पन्हाळा नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते .