
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
सामाजिक व राजकीय क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश पाटील कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचें लोहा येथे अनेक मान्यवरांनी अभिष्टचिंतन करून शुभेच्छा चा वर्षाव केला.
यावेळी सुधाकर पाटील पवार मित्र मंडळाच्या वतीने अंकुश पाटील कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाल पुष्पहार घालून व पेढा भरून भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी सुधाकर पाटील पवार, अभंग पाटील गाडेकर, परशुराम कदम, बाळू पाटील पवार, पांडूरंग पाटील, संदीप भुजबळ, सदाम शेख, स्वप्नील पांचाळ, पत्रकार युनुस शेख, विलास सावळे, गोविंद पवार , शिवराज पवार , संजय कहाळेकर , विनोद महाबळे , आदी मित्रमंडळी उपस्थित होती.