
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई: राज्यात कोरोनाची आकडेवारी पुन्हा वादात आहे. कोरोना रुग्ण वाढल्यास पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात येईल, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषेदेत केले होते.
त्यातच एक आता मोठी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर तातडीने टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी ६ वाजता हि बैठक पार पडेल. जर रुग्णसंख्या वाढत राहिली तर मास्क सक्ती करण्यात येईल, असे अजित पवार बोलले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
कोरोनाच्या तिन्ही लाटेत लोकांनी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे सध्या वाढत असलेल्या कोरोना रुगसंख्येवर राज्य सरकारची तसेच इतर सर्व यंत्रणांचे लक्ष आहे. आज जनता दरबार कार्यक्रमास उपस्थित राहिले असता, अजित पवार यांनी हि माहिती दिली.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाने धुमाकूळ घातले आहे. मटार काही महिन्यातच कोरोची आकडेवारी कमी झाल्याने दिलासा मिळाला होता. मात्र आता कोरोनाची आकडेवारी पुन्हा एकदा वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत आणि एकूणच राज्यात आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी काही कठोर निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात. मास्क सक्तीबाबतही मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात कोरोना नियम शिथिल केल्याने सार्वजनिक ठिकाणी पुन्हा गर्दी वाढली. आता मात्र पुन्हा काही निर्बंधांना सामोरे जाण्याची शक्यता आहे.