
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-देशात डझनभर जीवन विमा कंपन्या आणि शेकडो लाईफ इन्शुरन्स उत्पादने आहेत.यामुळे अनेकांना नेमका कोणता लाईफ इन्शुरन्स योग्य आहे हे ठरवणे कठीण होते.उत्तम लाईफ इन्शुरन्स घेण्यासाठी खालील बाबींचा विचार नक्की करा.
अनेकदा होते फसवणूक
योग्य माहिती नसल्यामुळे लोक चुकीचा विमा खरेदी करतात किवा एजंटवर विश्वास ठेवून त्याने सांगितलेला विमा निवडतात.मात्र,यात अनेकदा फसवणूकही होते.हे टाळण्यासाठी बाजाराचा थोडा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
तुमच्या हातात १५ दिवसांचा वेळ
सामान्यत: लोक जीवन विमा खरेदी करण्यापूर्वी मुख्य वैशिष्ट्यांची कागदपत्रे वाचत नाहीत किंवा समजून घेत नाहीत.पॉलिसी लागू झाल्यापासून १५ दिवसांमध्ये आपल्याला पॉलिसी रद्द करण्याचाही अधिकार असतो.हे अनेकांना माहिती नसते.
कुटुंबाला माहिती द्या!
तुमच्या कुटूंबीयांना खरेदी केलेल्या पॉलिसीची संपूर्ण माहिती द्या,जेणेकरुन घटना घडल्यास तुमच्या कुटुंबीयातील व्यक्तींना विम्याचा लाभ घेता येईल.सर्व पॉलिसी कागदपत्रे डिजिटल आणि कागदोपत्री स्वरूपात साठवा,जेणेकरुन गरजेच्या वेळी उपलब्ध होतील.
मोहात पडू नका
तुमची वयक्तिक माहिती अनेक विमा एजंट आणि कंपन्यांकडे असू शकते.या कंपन्या तुमच्या पॉलिसीमधील त्रुटी सांगून सांगून पॉलिसी बदलण्याची विनंती करु शकतात आणि विविध प्रकारचे प्रलोभने देऊ शकतात.मात्र,पॉलिसी बदलण्याच्या भानगडीत पडू नका.
विमा का आवश्यक आहे?
जीवन विमा खरेदी करण्यापूर्वी,तुम्ही पॉलिसी का खरेदी करत आहात,हे समजून घेणे महत्वाचे आहे.एखाचा व्यक्तिला किती रकमेचा विमा आवश्यक आहे,त्याची खर्चाच्या आधारे गणना करा.तो वार्षिक खर्चाच्या किमान २० पट असावा.