
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी संभाजी गोसावी .
नांदेड तालुक्यांतील भोकर पाडुंरणा येथे आपल्याच पोटच्या मुलांना आईने दोन चिमुकल्यांची हत्या करून आई व भावाच्या मदतीने पुरावा नष्ट केल्यांची घटना भोकर तालुक्यांत घडली असून याप्रकरणी पोलिसांत आज पहाटे तिला विरोधांत गुन्हा दाखल करण्यांत आला. या घटनेमुळे नांदेड जिल्हा चांगलाच हादरला. याबाबत पोलिस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन धुरपताबाई गणपत निलमवाड वय ३० रा.पाडुंरणा असे प्रमुख आरोपीचे नाव आहे आरोपी महिला पाडुंरणा येथे शेत शिवारात आखाड्यांवर पती आणि दोन वर्षीय मुलगा आणि ४ महिन्यांच्या मुलीसह राहत होती. तर सासू-सासरे दोघे अन्य दुसऱ्या शेतात वास्तव्यांस होते दरम्यान आरोपी धुरपताबाई निमलवाडने १ जून ला सायंकाळी ६ च्या सुमारांस मुलगा दत्ता गणपत निलमवाड वय २ वर्ष व मुलगी अनुसया गणपत निलमवाड (वय ४ माहिने) या दोघांची पाडुंरणा शिवारांत हत्या केली. त्यानंतर आरोपीने आपली आई कोंडाबाई पांडुरंग राजेमोड व भाऊ माधव पांडुरंग राजेमोड (दोघे रा. ब्राह्मणवाडा ता. मुदखेड) यांच्या मदतीने दोन्ही मयत लेकरांचे प्रेत जाळून पुरावा नष्ट केला आरोपी आईने असे कृत्य का केले? हे मात्र अद्याप समजू शकले नाही. याबाबत गावांतील गोविंद दगडुजी निलमवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी धुरपताबाई गणपत निलमवाड,कोडाबाई पांडुरंग राजेमोड, माधव पांडुरंग राजेमोड या तिघांच्या विरोधांत गुन्हा दाखल करण्यांत आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील करीत आहेत