
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पृथ्वीतलावर नवनवीन जीव जन्म घेत होते. अनेक प्रकारचे प्राणी, वनस्पती, पक्षी जन्माला येत होते. एकदा देवाने नविन जन्मास आलेल्या जिवांची सभा बोलाविली. अनेक प्रकारचे पशु पक्षी या सभेला हजर होते. सभेचा विषय होता: प्रत्येकाला त्यांच्या मनानुसार मागणीनुसार वय वाटणे. देव प्रत्येकाला त्यांना विचारून त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या आयुष्याचे वर्ष ठरवत होते. प्रत्येकजण आपआपलं वय घेवून पृथ्वीतलावर परत येत होते.
देव प्रत्येकाला आनंदाने वय वाटत होते. कोणी नाराज होणार नाही याची काळजी घेत होते. वय वाटण्याचे काम संपत आले होते. तेथे शेवटी माणुस, गाढव, कुत्रा व घुबड येवढेच तेथे देवा समोर रांगेत उभे होते. आता मनुष्याची बारी होती. देवाने त्याला विचारले, हे माणसा बोल तुला किती वर्षाचे आयुष्य पाहिजे. माणुस थोडसं गोधळलेलं होतं तो म्हणाला देवा मला चाळीस वर्षांचं आयुष्य दे. चाळीस वर्षांच्या कालावधीत मी खुप काही चांगलं काम करीन. मी आनंदाने जगेन. दुसऱ्या प्राण्याला ही आनंदाने जगण्यासाठी मदत करेण. देवा माझी प्रार्थन आहे मला चाळीस वर्षाचं आयुष्य बकळ झालं.
देवाने माणसाचे बोलणे शांत व प्रसन्नपणे ऐकून घेतल्यानंतर देव म्हणाला ताथस्तू. हे ऐकून माणूस आनंदी झाला व पृथ्वीवर परत आला. माणसानंतर देवाने गाढवाला विचारले बोल गर्दभराज बोल तुला किती वर्षाचं आयुष्य जगायचं आहे? हा प्रश्न ऐकून गदर्भराजने आनंदाने मागचे दोन्ही पाय हवेत झाडले. समोरचे दोन्ही पाय वर उचलून देवाला नमस्कार केला व भसाडया आवाजात एक आनंदाची आरोळी ठोकून देवास म्हणाला, “देवा मला ही माणसासाखंच चाळीस वर्षाचं आयुष्य दे. हे ऐकून देवाने तथास्तू म्हटले. आता गाढवालाही चाळीस वर्षाचं आयुष्य मिळालं. गाढवही आनंदाने पृथ्वीतलावर आनंदाने गाणे गात परत आला.
आता देवासमोर कुत्र्याची बारी होती. कुत्रा देवासमोर थांबला. तो प्रेमाने शेपटी हालवत होता. कानाची हलचाल करत होता.वाकडी मानकरून देवाकडे पहात होता. देवाने विचारले बोल बाबा तुला किती वर्षाचे आयुष्य पाहिजे? हे ऐकून कुत्रा पुढील दोन्ही पायावर बसून देवाला नमस्कार केला. कुंऽऽ कुंऽऽ करत भो भो भुंकत म्हणाला देवा मलाही चाळीस वर्षाचं आयुष्य दे. देव प्रसन्नतेने म्हणाला’तथास्तू’ कुत्राही आनंदाने पृथ्वीकडे निघाला. शेवटी घुबड देवासमोर पंख फडकवत जाऊन बसला. दोन्ही पंख पसरून घूंऽऽ घूंऽऽ करत देवाला नमस्कार केला. देव घुंबडाला विचारले बोल दिवाभीत तुला किती वर्षे आयुष्य पाहिजे? घुबड आनंदाने दोन्ही पंख पसरवून म्हणाला देवा मला पृथ्वीवर चाळीस वर्ष राहता येईल येवढं आयुष्य दे घुबडाचं बोलणं ऐकून देव म्हणाला दिलं तुला चाळीस वर्षाचं आयुष्य. आता घुबड ही पृथ्वीतलावर आला.
पृथ्वीवर माणुस गाढव व कुत्र्याला आपला दास बनविले. व घुबड झाडाच्या डोलीत दिवसभर बसून राहयचा व रात्रीला बाहेर पडायचा. गाढवाला माणसाने राबराब राबऊन घेवू लागला. गाढवाकडून दिवसभर वजन वाहण्याचं काम करून घ्यायचं व रात्रीला खाण्यासाठी काहीही द्यायचं नाही. उपाशी पोटी गाढव राहायचं उंकड्यावर जे मिळेल ते खायचं. तर कुत्र्याला खाण्यास मिळायचं पण साखळीनं बांधलेलं असायचं. रात्रभर रखवाली. सारखं भो भो करून भुंकायला लागायचं. त्या शिवाय त्यालाही भाकर मिळत नसे. थोड्याचं दिवसात गाढव कामाला कंठाळला. तो पुन्हा देवाकडे गेला व देवाला म्हणाला देवा देवा माझ्यावर एक उपकार कर. हे ऐकून देवाने गर्दभराजला विचारले बोल गदर्भराज काय झालं? माझ्याकडून काय पाहिजे? गाढव विनंती करत देवाला म्हणाला देवा मी तुझ्याकडून चाळीस वर्षाचं आयुष्य मागितलं होतं; पण मला आता चाळीस वर्षाचं आयुष्य नकोय. माझा मालक मला निट वागणुक देत नाही. दिवसभर कष्टाची कामे माझ्याकडून करून घेतो; पण खाण्यासाठी काहीच देत नाही. मला खूपच त्रास होतोय. हे ऐकून देव म्हणाला बोल कितीवर्षाचं आयुष्य पाहिजे? गाढव म्हणाला मला फक्त विस वर्षाचं आयुष्य दे. देवाने त्याला विस वर्षाचं आयुष्य दिले व विस वर्ष शिल्लक ठेवले.
काही दिवसानंतर माणसाला वाटू लागले हे चाळीस वर्ष तर असेच निघून जातील. या चाळीस वर्षांच्या कालावधीत आपणास काहीच करता येणार नाही. देवाने आणखी काही वर्ष वाढवून दिले तर बरं होईल म्हणून माणूस देवाकडे गेला. देवासमोर दोन्ही हात जोडून म्हणाला देवा मला थोडं जास्त आयुष्य दिलं तर बरं होईल. माणसाचं बोलणं ऐकून देव म्हणाला अरे मानवा गाढवाला मी चाळीस वर्षांचं आयुष्य दिलं होतं पण; त्याने फक्त विस वर्षांचंच आयुष्य घेतलं आहे. त्यातले विस वर्ष माझ्याकडे शिल्लक आहेत. गाढवाचे उर्वरित आयुष्य तूला देवू का? माणुस ताबडतोब म्हणाला हो देवा मला द्या देवाने जादा विस वर्ष माणसाला दिले आता माणसाचं आयुष्य साठ वर्षाच झालं. माणुस पृथ्वीतलावर येवून आनंदाने जगू लागला.
कुत्राल्याही मानसाने दास बनवले होते. कुत्रा घराचं रक्षण करत. मालकावर लहान मोठं संकट आलं की मालकाच्या मदतीला धावून जात. कुत्र्याला दिवसभर बांधून ठेवत.यांचा त्याला कंटाळाच आला होता. असं चाळीस वर्ष या पृथ्वीवर जगणं त्याला अवघड वाटू लागलं म्हणून तो ही देवाकडे गेला व देवाला प्रार्थना करत म्हणाला देवा मला चाळीस वर्षाचं आयुष्य नकोय. मला फक्त विसच वर्षाचं आयुष्य दे. ते वीस वर्ष मी आनंदाने जगेन. देवाने त्याचेही विस वर्ष आयुुष्यातले काढून घेतले. विस वर्षाचं आयुष्य घेवून कुत्रा परत आला.
येथे पृथ्वीवर मनुष्याला पुन्हा वाटू लागलं साठ वर्षात या पृथ्वीतलावर आपण काहीच करू शकत नाही. पुन्हा देवाकडे जावे व थोडेसे जादा आयुष्य वाढवून घ्यावे. म्हणून माणूस पुन्हाएकदा देवा कडे गेला. देवाला प्रार्थना करत तो म्हणाला देवा मला पुन्हा आयुष्य वाढवून दे. देव म्हणाला हे बघ मानवा माझ्याकडं विस वर्ष कुत्र्याचे आयुष्य शिल्लक आहे ते देवू का? मनुष्य खुष होत म्हणाला देवा मला ते विस वर्ष दे. ते मी आनंदाने स्विकारेन. देवाने कुत्र्याचे विस वर्ष मानवाला दिले. मानसाचे आयुष्य आता ऐंशी वर्षाचे झाले. मनुष्य पृथ्वीवर परत आला व आपल्या कामात रमला.
घुबडाने ही देवाकडून चाळीस वर्षे आयुष्य मागूण घतलं होतं. घुबडाला दिवसा काही दिसत नव्हतं. दिवसभर झाडाच्या डोलीत बसून तो कंटाळला होता. अशी चाळीस वर्ष जगावं? नाही नाही हे फार होतंय म्हणून घूबड ही देवापुढे नतमस्तक होऊन देवाला म्हणाला देवा मला चाळीस वर्षाचं आयुष्य नकोय मला फक्त विस वर्ष पुरे आहेत. देवाने घुबडाचे आयुष्याचे विस वर्ष कमी केले व घुबडाला परत पाठवले.
मानसाला वाटू लागले आरे यार आपण साठ काय अन ऐंशी काय आपण येवढ्या आयुष्यात काहीच करू शकत नाही. जर आपणास शंभर वर्षाचं आयुष्य मिळालं तर किती चांगलं होईल. असं विचार करत माणुस पुन्हा देवाकडे गेला व देवाला म्हणाला ए देवा देवा मला आणखी काही वर्ष आयुष्य वाढवून दिलं तर बरं होईल माझं. मला आनंद मिळेल. मला नविन काही तरी करता येईल. देवाकडे घुबडाच्या आयुष्यातले विस वर्ष शिल्लक होतेच. देव ही आनंदाने म्हणाला अरे मानवा माझ्याकडे घुबडाच्या आयुष्याचे विस वर्ष शिल्लक आहेत ते मी तूला देत आहे. हे ऐकून मनुष्याला खूप आनंद झाला. त्याने आनंदाने टाळ्या वाजविल्या. जाग्यावर दोनचार उड्या मारल्या. आता मनुष्य शंभर वर्षाचं जीवन पृथ्वीवर जगणार होता.
दिवसा माघून दिवस, महिन्या माघून माहिने, वर्षा माघून वर्ष सरत गेले. आता बघा गंमत वयाच्या चाळीस वर्षांपर्यंत आपण किंवा सामान्य माणुस आईवडीलाच्या सावलीत माणसाचे कसे निघून जातात हेच कळत नाही. बहुधा चाळीशीनंतर आई बाबा या जगाचा निरोप घेतलेले असतात. घराची जबाबदारी आपल्यावर येते. चाळीस वर्षानंतर जबाबदारीचं ओझं आपल्यावर येते. आता संसार चालवण्यासाठी राबराब राबावे लागते. गाढवं सारखं काम करावं लागते. चाळीस वर्ष देवाकडून मागून घेतले ते स्वतःचे आयुष्य होतं. पण पुढील विसवर्ष मानसाने गाढवाचं आयुष्य मागून घेतलं होतं म्हणून त्याला गाढवासारखं चाळीस ते वयाच्या साठीपर्यंत राबावे लागते. माणुस वयाच्या साठीपर्यंत गाढव काम करत रहातो.
मनुष्य वयाची साठी पूर्ण केलं की म्हणतात अरे त्याला साठी लागलीय त्याची बुद्धी नाटी झालीय. या वयात उगीच आपणास वाटते कुटुम्बातील सर्वजण माझं ऐकावे. पण येथे कोणीच आपलं ऐकत नाहीत. काहीजण मनामनात तर काहीजण उघडपणे म्हणतात हा काय कुत्र्यासारखं सारखं सारखं भुंकत राहातो. गप्प म्हणून बसत नाही. पूर्वी जन्माचं कुत्रा होता की काय. त्याचं खरचं आहे मानवाने साठ ते ऐंशी हे आयुष्य कुत्र्यांचं मागून घेतलेले आहे. कितीही भुंकत रहा. कुटुम्बातील सदस्य आपणाकडे लक्ष देत नाहीत. भुंकू द्या म्हणतात.त्याला कोणीही मान देत नाही.
आता ऐंशी ओलाडलो की तुमच्याकडे कोणी ढुंकुनही पहात नाहीत. ऐंशी ते शंभर मानवाने घुबडाचे आयुष्य मागून घेतलंय. दिवसा घुबड झाडाच्या डोलीत जसा गुपचूप डोळे उघडे ठेवून बसलेला असतो तसचं आपल्यालाही बसून रहावे लागते. येणाऱ्या जाणाऱ्या कडे पहातो पण घुबडला दिवसा निट दिसत नाही. मग आपल्याला कसे दिसनार? उघडा अंधूक डोळे पहात राहा अंधूक पणे गुपचूप येणाऱ्या जाणाऱ्या कडे.
मला वाटते आता आपणास कळालं असेल चाळीशीनंतर मनुष्य कसा वागतो? असा का वागतोय?
राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड-६
९९२२६५२४०७.